Sunday, March 1, 2026
Homeलेखस्मार्ट मीटरच्या नावाखाली गरिबांच्या घरांवर दरोडा .

स्मार्ट मीटरच्या नावाखाली गरिबांच्या घरांवर दरोडा .

महावितरण कंपनीने राज्यातील दोन कोटी ४१ लाख ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय घेतला आहे . त्याची सुरवात लवकरच महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे . कारण याची टेंडर मंजूर झाली आहेत . महाराष्ट्राचे लाडके ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मार्ट मीटर योजना महाराष्ट्रात सुरु केलेली आहे . या योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्मार्ट मीटर बसवले जाणार आहेत . सर्व मीटर बसवण्याचा खर्च ३९६०२ कोटी एवढा आहे . याचे टेंडर ऑगस्ट २०२३ ला मंजूर झालेले आहेत . भांडुप ,कल्याण,कोकण , या भागामध्ये ऐकून ६३,४४,०६६ मीटर बसवले जाणार आहेत . त्यासाठी खर्च येणार आहे ७५९४ कोटी , आणि हे टेंडर ऑगस्ट मध्येच देण्यात आलेले आहेत . बारामती ,पुणे मध्ये एकूण मीटर बसवले जाणार आहेत . ५२४५९१७ त्यासाठी खर्च आहे ६२९४. २८ कोटी याचेही टेंडर गौतम अदानीला देण्यात आलेले आहे .नाशिक ,जळगावमध्येएकूण  मीटर बसवायचे आहेत . २८८६६२५ याचा खर्च आहे ३४६१. ०६ कोटी हे टेंडर हैद्राबादच्या एका  एन .एन .सी  नावाच्या कंपनीला देण्यात आलेले आहे . या कंपनीचा मूळ व्यवसाय आहे बांधकाम या बांधकाम कंपनीचे नाव आहे नागार्जुन कन्स्ट्रशन कंपनी म्हणजे MSEB चे मीटर बसवण्याचे टेंडर बांधकाम कंपनीला देण्यात आले आहे .लातूर ,नांदेड  आणि औरंगाबाद मध्ये एकूण मीटर बसवायचे आहेत २७७७७५९ हे मीटर बसवण्याचा खर्च आहे ३३३०. ५३ कोटी हे टेंडर मॉन्टो कार्लो कंपनीला देण्यात आलेले आहे .

चंद्रपूर ,गोदीया ,आणि नागरपूरला एकूण  मीटर बसावयाचे आहेत . ३०१३०३४६ याचा खर्च आहे . ३६३५. ५३ कोटी हे टेंडर मेसर्जेन कंपनीला देण्यात आलेले आहे . अकोला ,अमरावती मध्ये एकूण  मीटर बसावयाचे आहेत . २१७६६३६ खर्च आहे २६०७. ६१ कोटी ज्यांना हे मीटर बसवण्याचे काम दिले आहे . त्यामध्ये अनुभव असलेली जीन्स हि एकच कंपनी आहे . यांनी ३३१४ कोटीचे टेंडर भरलेले आहे . बाकीच्या कंपन्यांना कुणाकडून तरी विकत घेऊन मीटर लावावे लागणार आहेत .

बारामती ,पुणे भागात मीटर बसवण्याचे काम अदानीला  देण्यात आलेले आहे . या भागामध्ये मीटर बसवण्याचा खर्च ३३१४ कोटी ७२ लाख इतका आहे . म्हणजे एक मीटर बसवण्याचा खर्च ६३१८ रुपये पकडलेला आहे . टेंडर ३३१४ कोटीचे असताना महाराष्ट्र शासनाने अदानीला ६२९४ कोटी दिलेत . म्हणजे दुपट्ट पैसे दिले आहेत . उत्तर प्रदेश मध्ये ,बडोद्या मध्ये लोकांनी अंदोलन  केल्यावर केंद्रीय ऊर्जा सचिव आभा शुक्ला यांनी एक मीटर  ६५०० ला बसवण्याचे आदेश दिले आहेत . पण अदानीला  महाराष्ट्र शासनाने १२००० हजार प्रती मीटर दिले आहेत.ग्राहकांना असे सांगण्यात आले आहे कि वीज चोरी थांबेल पण हा भोळा समज आहे . विजेची चोरी हि २० किलोवॅट पेक्षा जास्त मोठे ग्राहक आहेत तिथेच जास्त विजेची चोरी होते . हे जे लोक वीज चोरी करतात तिथे मीटरच लावला जाणार नाही . या अगोदर वीजपुरवढा हि सेवा  मानली  जात होती . ती राहणार नाही कारण आपण कंजुमर  वरून कस्टमार होणार आहोत .

यातला पहिला बळी शेतकरी असणार आहे . दुसरा बळी सर्व भक्ताचा असणार आहे . आणि तिसरा बळी  हा गोरगरिबांचा असणार आहे . या राज्यातील सर्व सामान्यग्राहक आणि छोटे उद्योग ,व्यापारी हे सर्व प्रीपेड च्या नावरती चालेल्या दरोड्याचे बळी असणार आहेत . या दरोड्याची कोणतीच तक्रार आपणाला करता येणार नाही . कारण आपण ग्राहकाचे कस्टमर झालो आहोत . आणि हा दरोडा घातलाच जाईल असा कायदाच मंजूर  करण्यात आलेला आहे . हे दरोडेखोर पुन्हा एकदा आपणाला अंधाराकडे घेऊन चालले आहेत . स्मार्ट मीटर आणण्याची योजना हि कॉर्पोरेट कंपन्यांना लाखो करोडो रुपये मिळावेत हाच आहे . अदानी सारख्या माणसाचा फायदा होण्यासाठी गरिबांच्या खिशातील पैसा काढून अशा उदयोग पतींना देण्याचा मूळ उद्देश आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments