भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयाचे मुख्यालय आयुक्त तथा लीडर ट्रेनर अरविंद शंकरराव जावळे यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले . जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षक ,तालुका मास्तर , होमगार्डचे जिल्हा समादेशक ते स्काऊट गाईड जिल्हा संस्थेचे मुख्यालय आयुक्त असा त्यांचा प्रवास झाला . ते हॅम रेडिओचे साताऱ्यातील पहिले ऑपरेटर ,राष्ट्रीय प्रशिक्षक ,शालेयस्तरावर विविध समुदायीक विकास कार्यक्रम व सेवा उपक्रम राबविल्यामुळे त्यांना राष्ट्रीय पातळीवरील पंतप्रधान ढाल पुरस्कार ,राज्यस्थरावरील उत्कृष्ट स्काऊटर आणि बार टू मेडल ऑफ मेरिट या पुरस्कारने गौरविण्यात आले होते .
मॅपिंग व स्टार गेझिंग ,फर्स्ट एड ,आपत्ती व्यवस्थापन ,सिग्नलिंग ,मॅसेंजर ऑफ पीस व फ्री बेईंग मी असे अनेक राष्ट्रीय स्थरावरील प्रशिक्षणे घेऊन जिल्ह्यातील व राज्यातील अनेक स्काऊटमास्टर कॅप्टन शिक्षक स,शिक्षिका यांना प्रशिक्षणे दिली .
कडक शिस्त ,करारी आवाज व कामातील तत्परता ,शांत ,संयमी व प्रेमळ स्वभावाचे ते होते . ते ग्रंथालय मीत्र आणि महाराष्ट्र अंधश्रद्ध निर्मूलन समितीचे ते सक्रिय कार्यकर्ते म्हणून हि त्यांची ओळख सर्वदूर आहे . त्यांना वाचनाची प्रचंड आवड असल्याने स्वतःच्या वैक्तीक ग्रंथालयात विविध विषयांची ग्रंथसंपदा त्यांनी जमवली आहे . मंदिर समजून जिल्हा स्काऊट गाईड कार्यालयात नियमित उपस्थित राहून दैनंदिन कामकाजात कुठलेही मानधन न घेता मदत करत होते