Saturday, August 9, 2025
HomeMain Newsसामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका प्रा .पुष्पाताई भावे यांचे निधन

सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका प्रा .पुष्पाताई भावे यांचे निधन

जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका प्रा. पुष्पाताई भावे मागील काही दिवसांपासून खूप आजारी होत्या . प्रभावी वक्त्या ,परखड समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा भावे यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी दीर्घ आजाराने प्राणजोत मालवली . विचारवंत आणि लेखिका प्रा . भावे यांचा विद्याधार्थी दशेपासून राष्ट्र सेवा दल आणि लोकशाहीवादी चळवळणींशी संपर्क होता . मराठी व संस्कृत हे विषय घेऊन त्यांनी मुंबईच्या एलिफिन्सटन कॉलेज मधून एम . ए . ची पदवी प्राप्त केली आणि मुंबईतच सिडनहॅम महाविद्यालयात त्या प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या . पुरोगामी विचारसरणी आणि पक्की वैचारीक बैठक असलेल्या पुष्पाताई यांनी गेल्या पाच – सहा दशकातील सगळ्या प्रगतिशील चळवळींशी जोडून घेऊन काम केले . संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन ,दलित पँथरची चळवळ ,एक गाव ये पाणवठा चळवळ , हमाल पंचायत ,देवदासी मुक्ती अशा विविध चळवळींमध्ये योगदान देतानाच शेतकरी ,कामगार ,आदिवासी ,दलित आदी घटकांच्या लढ्यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग दिला . तसेच त्या उत्तम लेखिका सुद्धा होत्या . डॉ . श्रीराम लागू यांच्या अमृत मोहोत्सवानिमित्त पुष्पा ताई च्या संपादनाखाली निघालेला “आम्हाला भेटलेले डॉ . श्रीराम लागू ” हा ग्रंथ त्यांच्या वेगळ्याच पैलूचे दर्शन घडवतो .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments