Friday, August 8, 2025
Homeसातारासाताऱ्यातील टोलनाक्यावर १५ लाखांची रोकड, मशिन विक्री व्यवहारातील रक्कम असल्याचा व्यावसायिकाचा दावा

साताऱ्यातील टोलनाक्यावर १५ लाखांची रोकड, मशिन विक्री व्यवहारातील रक्कम असल्याचा व्यावसायिकाचा दावा

पुणे-बंगळुरू महामार्गावरील नाकाबंदी दरम्यान तासवडे (ता. कराड) येथील टोलनाक्यावर शनिवारी दुपारी महिंद्रा बोलेरो गाडीतून १५ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. गाडीतील दोन जण जण बंगळुरूहून अहमदाबादला निघाले होते. दरम्यान, गाडीतील रक्कम ही औषध गोळ्या तयार करणाऱ्या मशिनच्या विक्री व्यवहारातील असल्याचा दावा गाडीतील दोन्ही व्यावसायिकांनी केला आहे.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावरील कराड तालुका हद्दीत तासवडे टोलनाक्यावर नाकाबंदी करण्यात आली आहे. याठिकाणी वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. शनिवारी दुपारी बंगळुरूहून अहमदाबादकडे निघालेल्या महींद्रा बोलेरो (क्र. जी. जे. २७ ई. ई. ८७३८) या वाहनाची तपासणी करताना गाडीत १५ लाखांची रोकड सापडली. त्या गाडीत दोघेजण होते.गाडीतील दोघांकडे पोलिसांनी चौकशी केली असता, आपली औषध गोळ्या तयार करणारी मशीन बनवणारी आणि विक्री करणारी कंपनी असल्याची माहिती त्यांनी दिली. कंपनीची मशीन अमेरिकेतील लाईफ केअर कंपनीचे मालक राजेंद्रकुमार सुबुध्दी यांना विक्री केली जाणार होती. त्यासाठी त्या कंपनीचे बंगळुरू येथील प्रतिनिधी कुमार नायर यांच्याशी व्यवहार झाला असुन सदरची रक्कम त्या व्यवहारातील असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली आहे.बोलेरो गाडीत रोकड सापडल्यानंतर कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील भरारी पथकास घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. त्यानंतर संबंधित गाडी आणि रक्कम तळबीड पोलीस ठाण्यात नेण्यात आली. तसेच आयकर विभागाला कळविण्यात आलं. गाडीत सापडलेल्या रकमेबद्दल आयकर विभागाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाही केली जाणार आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments