सातारा पोलीस अधीक्षक यांनी ३०.३.२०१९ रोजी परिपत्रक काढून वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वाहने अडवून कागदपत्रे तपासू नयेत असा लेखी आदेश दिला असल्याने वाहन चोरांना मात्र रान मोकळे मिळाले आहे .मागील पंधरा दिवसात १७ वाहनांची चोरी सातारा शहर व परिसरातून झालेली आहे .कागदपत्राची तपासणी केली जाणार नसल्याने चोरी करून घेऊन जाणाऱ्या चोरटयांना मात्र मोकाटच मैदान मिळाल्याने वाहन चोरीचे प्रमाण वाढत आहे .वाहनाच्या कागदपत्रांच्या तपासणी मुळे असे वाहन चोर पकडले जात होते . व अशा बेकायदेशीर घटनांना पायबंद बसत होता .परंतु कोणतीही तपासणी होत नसल्याने हे वाहन चोरटे मोकाट सुटत आहेत.त्या मुळे वाहन चोरीचे प्रमाण सातारा शहरात व परिसरात वाढत आहे .अशा तपासण्या झाल्या नाहीत तर विना लायसन वाहन चालवणारे वाढतील व अपघातामध्ये वाढ होईल . अशा वाहन चोरट्यांना कुणाचा धाकच राहिलेले नसल्याने वाहनाच्या चोरीचे प्रमाण वाढत आहे .