Monday, March 23, 2026
HomeMain Newsसातारा पोलीस मुख्यालयात ‘वृंदावन पोलीस टाऊनशिप’चे २ जानेवारीला लोकार्पण

सातारा पोलीस मुख्यालयात ‘वृंदावन पोलीस टाऊनशिप’चे २ जानेवारीला लोकार्पण

पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या निवासासाठी सातारा पोलीस मुख्यालयात उभारण्यात आलेल्या आधुनिक व सर्व सोयींनी युक्त वृंदावन पोलीस टाऊनशिप’ या गृहनिर्माण प्रकल्पाचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि. जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.

पोलीस मुख्यालय, सातारा येथील सुमारे १०० वर्षांपूर्वीच्या ब्रिटीशकालीन कौलारू व पडझड झालेल्या बैठ्या चाळी स्वरूपातील निवासस्थाने राहण्यास अयोग्य व अपुरी ठरल्याने ती पाडून त्या जागेवर नवीन निवासस्थाने उभारण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ, मुंबई यांच्याकडे सादर करण्यात आला होता.

या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर सदर जागेवर एकूण ६९८ निवासस्थाने उभारण्यात आली आहेत. त्यामध्ये पोलीस अंमलदारांसाठी ६७२ निवासस्थाने, पोलीस अधिकाऱ्यांसाठी २४ निवासस्थाने, पोलीस उपअधीक्षकांसाठी स्वतंत्र बंगलो यांचा समावेश आहे. याशिवाय मल्टीपर्पज हॉल, व्यायामशाळा आणि वाचनालय अशा सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या गृहनिर्माण प्रकल्पाचे बांधकाम मेसर्स हर्ष कन्स्ट्रक्शन, नाशिक यांनी पूर्ण केले आहे. सातारा जिल्हा पोलीस दलासाठी उभारण्यात आलेल्या या संकुलास वृंदावन पोलीस टाऊनशिप’ असे नामकरण करण्यात आले असून, येथील निवासस्थाने पोलीस अधिकारी, अंमलदार, मंत्रालयीन कर्मचारी तसेच सफाई कामगार यांना वाटप करण्यात आले आहे.

सदर संकुलामध्ये मेगावॅट क्षमतेचे विद्युत सब-स्टेशन, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एस.टी.पी.), तसेच घनकचरा व्यवस्थापन युनिट उभारण्यात आले आहे. स्वच्छता, साफसफाई व उद्यान देखभालीसाठी BVG या खाजगी संस्थेची नेमणूक करण्यात आली असून, सुरक्षेसाठी सुमारे १०० सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा रक्षकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

या आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तसेच त्यांच्या कुटुंबियांचे जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होणार असून, स्वच्छ, सुरक्षित आणि उच्च प्रतीच्या सुविधा उपलब्ध झाल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments