सातारा जिल्ह्यातील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित पासपोर्ट कार्यालयाचे उद्घाटन अखेर १४ मे रोजी साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे हस्ते होणार असल्याची माहिती क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेली आहे.
सातारा जिल्हा भौगोलिक दृष्ट्या किचकट आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात याठिकाणी पासपोर्ट कार्यालय व्हावे यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते. खासदार उदयनराजे भोसले यांनी याबाबतचा पाठपुरावा परराष्ट्र मंत्रालयाने केला होता. पुणे येथे पासपोर्ट काढण्यासाठी सातारा जिल्ह्यातील लोकांना गेल्या अनेक वर्षांपासून जावे लागत होते. पूर्वी ही प्रक्रिया सातारा येथील जिल्हा विशेष शाखा येथे होत होती. परंतु पासपोर्टचे कामकाज ऑनलाईन झाल्यानंतर ही सर्व प्रक्रिया पुणे ते हलवण्यात आली होती.
पासपोर्ट काढण्यासाठीची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुलाखतीसाठी तारीख दिली जात होती. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील लोकांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी व मुलाखत देण्यासाठी पुणे येथील पासपोर्ट कार्यालय मध्ये जावे लागत होते. त्यामुळे अनेक लोकांचा या किचकट प्रक्रियेमध्ये वेळ वाया जात होता.
अनेक लोकांनी पासपोर्ट अधिकाऱ्यांना साताऱ्यात कार्यालय सुरू करावे याबाबत गळ घातली होती.
सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात पासपोर्ट कार्यालय व्हावे यासाठी अनेकदा पाठपुरावा केला होता. त्यानुसार परराष्ट्र मंत्रालयाने अखेर दखल घेऊन साताऱ्यात पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याची प्रक्रिया सुरु केले होती. अखेर पासपोर्ट कार्यालयाची प्रतीक्षा संपली असून १४ मे रोजी सातारा येथील मध्यवर्ती पोस्ट कार्यालयात नूतनपासपोर्ट कार्यालयाचे उद्घाटन होणार असून, या उद्घाटन सोहळ्याला परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे, सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल पोलीस अधीक्षक संदीप पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीमध्ये नवीन पासपोर्ट कार्यालयाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी आनंद ताकवले यांनी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेले आ



