Friday, August 8, 2025
HomeUncategorizedसातारा जिल्ह्यातील खंडणी,दरोडे,खाजगी सावकारी,गुन्हे दाखल करण्याबाबत आव्हान

सातारा जिल्ह्यातील खंडणी,दरोडे,खाजगी सावकारी,गुन्हे दाखल करण्याबाबत आव्हान

टोळी जमवून दरोडे टाकणे ,खंडणी मागणे,खाजगी सावकारी ,दहशत पसरून दागिने व रोख रक्मेची जबरी चोरी करून स्वतःच्या आर्थिक फायदा करून घेणारे गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी पोलीस अधिक्षक श्री .संदीप पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक श्री .विजय पवार ,यांनी दिलेल्या सूचनांना प्रमाणे सध्या सातारा जिल्यातून संघटीत गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी मोका अंतर्गत कारवाया सुरु आहेत.

तरी विनोद उर्फ बाळू खंदारे,प्रमोद उर्फ खंड्या धाराशिवकर ,अनिल कस्तुरे,आकाश उर्फ बाळ्या खुडे,दत्ता जाधव यांनी दोरोडा ,जबरी चोरी,खंडणी व अपहरण असे गुन्हे केलेले असतील परंतु त्यांचे दहशती मुळे तक्रार  देण्यास घाबरत असतील अशा नागरिकांना कळवण्यात येती कि ,विनोद उर्फ बाळू खंदारे ,प्रमोद उर्फ खंड्या धाराशिवकर,अनिल कस्तुरे ,आकाश उर्फ बाळ्या खुडे ,दत्ता जाधव यांनी गुन्हे केले असल्यास त्यांचे विरोधी स्थानीक पोलीस ठाण्या मध्ये गुन्हे दाखल  करावेत ,तसेच या शिवाय जिल्ह्यातील अथवा जिल्ह्या बाहेरील आणखी  कोणी इसमांनी सातारा जिल्यात असे गुन्हे  केले असल्यास  त्यांचे वरही संबंधीत पोलीस ठाण्या मध्ये गुन्हे नोंद करावेत .दाखल गुन्ह्याची सत्यता पडताळून संबंधीत तक्रार/फिर्यादी यांना निशुल्क पोलीस संरक्षक पुरवण्यात येईल .असे आव्हान पोलीस अधिक्षक श्री .संदीप पाटील  व अप्पर पोलीस अधिक्षक श्री.विजय पवार यांनी नागरिकांना केली आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments