सातारा जिल्ह्याने गुरुवारी कोरोना बाधित रुग्ण संख्येचा ५ हजाराचा आकडा पार केला . रात्री उशिरा आलेल्या अहवालात २०३ इतके बाधित आले आहेत . कराड तालुक्यात रुग्ण संख्या १ हजारावर पोहचल्याने येथील कोविड हॉस्पिटल आणि प्रशासनावर मोठा ताण आला आहे . त्यातच व्हेंटिलेटर न मिळाल्याने शहरातील आणखी एकाचा काळ मुर्त्यू झाला. आत्तापर्यंत व्हेंटिलेटर अथवा वेळेत उपचार न मिळाल्याने ६ मृत्यू झाले आहेत .त्यामुळे शहरात संतापाचे वातावरण आहे . कराड येथील तीनही हॉस्पिटल जिल्ह्यासाठी असून शहरात बाधित असणाऱ्या रुग्णांना बेडसाठी वणवण फिरावे लागत आहे . अन्य आजारांच्या रुग्णांची हीच अवस्था असल्याने संताप व्यक्त होत आहे . बुधवारी येथील भाजी मंडईतील व्यापाऱ्याचा व्हेंटिलेटर उपलबध न झाल्याने दुर्दवी मुर्त्यू झाला . हि शहरातील सहावी घटना असून शहरात ३०० दवाखाने असताना व्हेंटिलेटर उपलबध होत नसल्याने शहरात संतापाचे वातावरण आहे . रुग्णवाहिका लवकर उपलबद्ध झाली नाही . त्यामुळे सायंकाळी सातारा येथे शासकीय रुग्णालयात नेत असताना त्यांचा मुर्त्यू झाला .
सातारा क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलयात वासोळे ता . सातारा येथील ४३ वर्षीय कोरोनाबाधित महिलेचा मुर्त्यू झाला आहे . साताऱ्यातील खासगी रुग्णालयात शहरातील गुरवार पेठेतील ७५ वर्षीय महिला ,कोडोली येथील ५८ वर्षीय महिला ,जकातवाडी येथील ७५ वर्षीय पुरुष ,या कोरोनाबाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे . त्यांचे खाजगी प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेले अहवाल कोरोनाबाधित आलेले आहेत .