सातारा जिल्ह्यात कोरोनाची एवढी गंभीर परिस्थिती होईल असे वाटत नसल्याने जिल्ह्यावासीय जूनपर्यंत बेफिकर होते . मात्र गेल्या दोन ,तीन महिन्यात जी परिस्थिती समोर आली त्यामुळे वातावरण पॅनिक झाले . शरीरातील ज्या ऑक्सिजन पातळीचा कधीच उल्लेख झाला नाही . ती चेक करण्याची वेळ अली आहे . त्याच ऑक्सिजन बेडची कमतरता असल्याने नागरिकांमध्ये भीती व गोंधळाचे वातावरण आहे . काळजी घेतल्यास संसर्ग टाळता येतो व कोरोना बराच होतो हि भावना नागरिकांमध्ये निर्माण होण्यासाठी प्रशासनाने तो विश्वास व दिलासा देण्याची सध्या प्रचंड गरज आहे . तो मासे कुटूंब माझी जबाबदारी या जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या मोहिमेतून दिला पाहिजे .
दरम्यान जिल्ह्यात सोमवारी रात्री आलेल्या रिपोर्ट नुसार ८९८ नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत . तर ३५ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मुर्त्यू झाले आहेत . तर सायंकाळी आलेल्या अहवालात ९३० नागरिकांनी कोरोनावर मात केली तर रात्री उशीरा आलेल्या अहवालात ९७३ एवढ्या जणांचा अहवाल बाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ . सुभाष चव्हाण यांनी दिली आहे .
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना सेंटर मध्ये डिसियचसी व सीसीसीमध्ये उपचार घेर असलेल्या संध्याकाळीपर्यंत ९३० नागरिकांना घरी सोडण्यात आले . रिकव्हरी रेट वाढू लागला असून कोरोना मुक्तीच्या आकड्याने १६ हजाराचा टप्पा पार केला आहे . आजपर्यंत जिल्ह्यातील १६,५२४ जणांनी कोरोनावर मात केली असून हि बाब दिलासा देणारी आहे . पश्चिम महाराष्ट्रात कोरोनमुक्तीच्या लढ्यात महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या कृष्णा हॉस्पिटला प्लाझ्मा थेरीपीस मान्यता मिळावी आहे . अशी मान्यता लाभलेले कृष्णा हॉस्पिटल जिल्ह्यातील एकमेव रुग्णालय असून या थेरपीचा लाभ कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी अधिक लाभदायी ठरणार आहे . जिल्ह्यातील पहिली चाचणी लॅब . कोरोना लस संशोधनात सहभागी असणारी जिल्ह्यातील एकमेव संस्था अशी कामगिरी करणाऱ्या कृष्णा हॉस्पिटलला प्लाझ्मा थेरपीस मान्यता मिळावी आहे . याबाबतचे अधिकृत पत्र अन्न व औषध प्रशासनाकडून प्राप्त झाले आहे .
मंगळवार पर्यंत जिल्ह्यात
एकूण नमुने ५७,३६९
एकूण बाधित २६,४४९
एकूण कोरोनमुक्त १६,५२४
एकूण मृत्यू ७२५
उपचारार्थ रुग्ण ९,२००
मंगळवारी
एकूण बाधित ९७३
एकूण मुक्त ९३०
एकूण बळी ३५