मराठ्यांना देश चालवायचा आहे, आरक्षण कसलं मागता,” असं वक्तव्य शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख संभाजी भिडे यांनी केलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारलं असता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार चांगलेच संतापले. यावेळी माध्यम प्रतिनिधींनाही त्यांनी फैलावर घेतलं. यावेळी, “संभाजी भिडे यांच्यावर वक्तव्य करण्याच्या लायकीची ती माणसं आहे का, असा सवाल शरद पवार यांनी केला. पुण्यातील मोदीबाग इथं शरद पवार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली, यावेळी त्यांनी संताप व्यक्त केला.
आपल्या वादग्रस्त वक्तव्यासाठी संभाजी भिडे यांना ओळखलं जाते. संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षण आंदोलनबाबत वक्तव्य केलं. “मराठ्यांना देश चालवायचा आहे. सिंहानी जंगल संभाळायचं असते, आरक्षणात कुठं मागता ? मराठा जात ही देशाचा संसार सांभाळणारी जात आहे, हे ज्या दिवशी मराठ्यांच्या लक्षात येईल, त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून निघेल. मात्र हे त्यांच्या लक्षात येत नाही, हे आपलं दुर्भाग्य आहे,” असं वक्तव्य त्यांनी केलं. याबाबत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना विचारलं असता. ते प्रचंड संतापले. “संभाजी भिडे यांच्यावर वक्तव्य करण्याच्या लायकीची ती माणसं आहे का,” असा सवाल त्यांनी यावेळी माध्यम प्रतिनिधीला विचारला.
निवडणूक आयोगानं जम्मू काश्मीर आणि झारखंड या दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर केल्या आहेत. यावर शरद पवार यांना विचारलं असता, ते म्हणाले की, “जम्मू कश्मीरसोडून झारखंड आणि हरियाणा इथं आमचे उमेदवार असणार आहेत. तिथं आम्ही निवडणूक लढवणार आहोत.” लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील विधानसभा निवडणुका पुढं ढकलण्यात आल्या आहेत, अशी चर्चा सुरू आहे. याबाबत शरद पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, मला त्याबाबत माहीत नाही. 15 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणात वन नेशन वन इलेक्शनचा आग्रह त्यांनी धरला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी तीन राज्यांची निवडणूक जाहीर झाली. मात्र यात महाराष्ट्राचा समावेश नाही. याचाच अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बोलतात एक आणि करतात एक, असा हल्लाबोल शरद पवार यांनी केला.
नवाब मलिक अधिकृतपणे अजित पवार यांच्यासोबत गेले असून आज अजित पवार यांचा कार्यक्रम आहे. याबाबत शरद पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, “बघुया आता काय होत आहे.” बारामतीत मला रस नाही, असं अजित पवार म्हणाले होते. यावर शरद पवार यांना विचारलं असता ते म्हणाले की, “सार्वजनिक जीवनात काम करत असताना त्यांना त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे,” असंही शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केलं.