Friday, August 8, 2025
HomeMain Newsशशिकांत शिंदेंचा शंभर कोटींचा दावा हा सर्वात मोठा राजकीय विनोद, मुनगंटीवारांचा टोला

शशिकांत शिंदेंचा शंभर कोटींचा दावा हा सर्वात मोठा राजकीय विनोद, मुनगंटीवारांचा टोला

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या शंभर कोटींच्या ऑफर प्रकरणावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शशिकांत शिंदे यांना निवडणूक खर्चाविषयी ज्ञान नाही. शशिकांत शिंदे कोरोना नंतरचा सर्वात मोठा राजकीय विनोद करत आहेत, अशा शब्दात मुनगंटीवार यांनी पलटवार केला आहे

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी असताना भाजपकडून मला पक्षप्रवेशाची ऑफर देण्यात आली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट शशिकांत शिंदे यांनी केले. भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळात अनेक नेत्यांना पक्षप्रवेशाच्या ऑफर देण्यात आल्या होत्या. त्यामध्ये माझाही समावेश होता, असा दावा शशिकांत शिंदे यांनी केला. त्यांच्या हा दावा खोटा असल्याचं स्पष्टीकरण सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे .“मला आश्चर्य वाटतं निवडणूल लढवताना 28 लाखांपेक्षा जास्त खर्चच करता येत नाही. त्यामुळे शशिकांत शिंदे यांनी शंभर कोटींची ऑफर दिली असं सांगणं म्हणजे त्यांना याबाबत ज्ञान नाही, असा अर्थ पकडयाचा. किंवा शशिकांत शिंदे कोरोना संकटानंतरचा या वर्षातला सर्वात मोठा जोक मारत आहे, असा अर्थ पकडायचा”, अशी प्रतिक्रिया मुनगंटीवार यांनी दिली.

कोण आहेत शशिकांत शिंदे?

शशिकांत शिंदे हे राज्यातील प्रमुख मराठा नेत्यांपैकी एक आहेत. ते पवार कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांपैकी एक म्हणून ओळखले जातात. सातारा जिल्ह्यातील राजकारणात त्यांचा दबदबा आहे. कोरेगाव मतदारसंघातून ते दोनदा विधानसभेवर निवडून गेले होते.

मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा धक्का बसला होता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांचे विधानपरिषदेत पुनर्वसन करण्यात आले होते. मुंबई आणि नवी मुंबईतील माथाडी कामगारांचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळेच शरद पवार यांनी यंदा नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत गणेश नाईक यांचे साम्राज्य खालसा करण्याची जबाबदारी शशिकांत शिंदे यांच्यावर सोपविली आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments