Monday, August 11, 2025
HomeUncategorizedशरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात

शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात

आज शरद पवार यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात झाला  आहे . सुदैवाने या अपघातात कुणीही जखमी झालेले नाही . मात्र,ताफ्यातील दोन वाहने एकमेकांवर आदळल्याने गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे . हि घटना जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात भुसाळवळ यावल रस्त्यावर घडली आहे . या घटनेमुळे काही वेळासाठी रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती . ती पोलिसांनी पुन्हा सुरळीत केली . आज शरद पवार हे जळगाव जिल्ह्याच्या  दौवाऱ्यावर होते . चोपडा येथील सभा आटपून ते पुन्हा भुसाळवलकडे निघाले होते . याचवेळी त्यांच्या वाहनाच्या समोर स्पीड ब्रेकर आल्यामुळे वाहन चालकाने वाहनाची गती कमी केली . मात्र याचा अंदाज मागून येणाऱ्या वाहनांना आला नाही . यामुळे ताफ्यातील शेवटी येत असलेल्या एका वाहनाची समोरील वाहनास धडक झाली . या धडकेमुळे दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे . सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments