Sunday, March 1, 2026
Homeसातारावेगाने जाणारी स्कॉर्पिओ 300 फूट गणेश खिंडीत कोसळली

वेगाने जाणारी स्कॉर्पिओ 300 फूट गणेश खिंडीत कोसळली

सातारा परिसरातील यवतेश्वर घाटाजवळील असणाऱ्या गणेश खिंडीत स्कॉर्पिओ गाडी 300 फूट खोल दरीत कोसळली. यामध्ये सात प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला असल्याची घटना गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली.8

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, चालकाचे नियंत्रण सुटून गाडी दरीत गेली. या गाडीमध्ये सात प्रवासी प्रवास करत होते. यामधील 2 जणांचा मृत्यू झाला असून इतर पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत.

कोरेगाव तालुक्यातील चिमणगाव येथील सर्वजण आहेत. संध्याकाळी उशिरा कास पठाराहून साताऱ्याकडे येत असताना ही घटना घडल्यानंतर घटनास्थळी तालुका पोलीस आणि छत्रपती शिवेंद्रराजे ट्रेकर्सची टीमने धाव घेतली. ट्रेकर्सच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्याचे काम रात्री उशिरा पर्यंत सुरू होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments