Sunday, March 1, 2026
HomeUncategorizedविलासपूरमधील वाईन शॉप शेजारी भरतो दारुड्यांचा अड्डा

विलासपूरमधील वाईन शॉप शेजारी भरतो दारुड्यांचा अड्डा

विलासपूर मधील एका वाईन शॉप शेजारी मोकळी इमारत असून या इमारतीमध्ये भरदिवसा दारुड्यांचा अड्डा भरतो .वाईन शॉप जवळच असल्याने व बसायला जागा असल्याने या दारूड्यांची चांगलीच सोय झाली आहे .दिवसभर या ठिकाणी हे दारुडे ठाण मांडून असतात .या दारुड्यांच्या  मुळे रस्त्यावरून कॉलेज,व शाळेला जाणाऱ्या मुली, महिला ,जेष्ठ नागरिक यांना येण्याजाण्यास अडचण होते.या ठिकाणी गर्दी असल्याने अपघात हि होतात .पाठीमागे एका नागरिकाचा या ठिकाणी अपघातामध्ये मृत्यू हि झाला आहे .तरी हि इथे काहीच फरक पडलेला नाही .उलट दारूड्यांची संख्या मात्र वाढतच आहे .या होणाऱ्या त्रासामुळे विलासपूर मधील नागरिक त्रस्त असून सदर वाईन शॉप हे विलासपूर मधून हलवण्याची मागणी होत आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments