Saturday, August 9, 2025
HomeMain Newsविधान परिषदेवरील १२ जणांच्या यादीत ही नावे

विधान परिषदेवरील १२ जणांच्या यादीत ही नावे

विधान परिषदेवर नियुक्त करावयाच्या १२ जणांची नावे जवळपास निश्चित झाली असून या १२ जणांच्या यादीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या यादीत गायक, अभिनेते, कलाकार, सांस्कृतिक क्षेत्रातील नामांकितांचा समावेश आहे. या यादीत राष्ट्रवादीकडून शेतकरी नेते राजू शेट्टी, धनगर समाजाचे नेते यशपाल भिंगे, भाजपमधून राष्ट्रवादीत आलेले एकनाथ खडसे, काँग्रेसकडून सचिन सावंत, रजनी पाटील, मुझफ्फर हुसेन यांच्या नावाचा समावेश असल्याचे सांगण्यात येते. या यादीत राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्या आदिती नलावडे यांचेही नाव आघाडीवर होते, पण ऐनवेळी ते वगळण्यात आल्याचे सांगण्यात येते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ तर काँग्रेसकडून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रत्येकी चार जणांची यादी सुपूर्द केली. राष्ट्रवादी काँग्रेसने प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचे नाव देण्यात आले असल्याचे सांगण्यात येते. आनंद शिंदे हे गायक कुटुंबातील असून त्यांचे सुपुत्र आदर्श शिंदेही गायक आहेत. काँग्रेसकडून गायक व संगीतकार अनिरुद्ध वानकर, शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील आणि मराठी अभिनेते आदेश बांदेकर यांचे नाव निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments