Sunday, March 8, 2026
HomeMain Newsवडिलांनी पोटच्या लेकीचा घेतला जीव १४ दिवसांनी सापडला मृतदेह

वडिलांनी पोटच्या लेकीचा घेतला जीव १४ दिवसांनी सापडला मृतदेह

कराड तालुक्यातील एक खळबळजनक घटना समोर  आलेली आहे . स्वतःच्या अल्पवयीन मुलीचा आई वडिलांनीच खून केल्याची घटना समोर आलेली आहे . या प्रकरणातील संशयित आरोपी आई वडिलांना कराड तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . प्रेमप्रकरणातून हा खून केल्याचे प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळालेली आहे . तब्बल १४ दिवसांनी पुरलेला मुलीचा मृतदेह आज रविवार दिनांक १ मी रोजी ताब्यात घेण्यात आला . घटनास्थळावरून मिळालेली प्राथमिक माहिती अशी ,कराड तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद १७ एप्रिल रोजी कराड पोलीस ठाण्यात दाखल झालेली होती . मुलगी बेपत्ता झाल्याचे फिर्याद मुलीच्या वडिलांनी दिलेली होती . या प्रकरणाचा तपास पोलीस निरक्षक दीपज्योती पाटील यांच्याकडे होता . शनिवारी रात्री फिर्यादी वडिलांकडे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर गुन्ह्याची कबुली दिली . यावेळी मुलीच्या वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीचे प्रेमप्रकरण होते असे सागिंतले ,यातूनच आई वडिलांनीच मुलीचा खून केला . त्यानंतर तिचा मृतदेह पवारवाडी येथील डोंगरावर पुरल्याची माहिती दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments