सातारा येथील मौजे विलासपूर गावातील नवीन नळ कनेक्शन घेण्यासाठी असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे . त्यातच जर कनेक्शनसाठी शासनाची फी ३१५० रुपये असतांना त्यामध्ये लोकवर्गणी ५००० रुपये व अंशदान रक्कम ५००० रुपये असे दहा हजार रुपये प्राधिकरणाकडून वसूल केले जात आहेत . त्यामुळे विलासपूर परिसरातील नागरिकांना या समस्यांचा सामना करावा लागत आहे .
मौजे विलासपूर येथील पार्शी विहिरी शेजारील पाणी योजना २००५ मध्ये सुरु करण्यात आलेली आहे . महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार लोकवर्गणी हि लोकसंख्येच्या प्रमाणात दरडोई भांडवली खर्चाच्या प्रमाणात वसूल करावी असे असताना हि सरसकट ५००० हजार रुपये लोकवर्गणी जमा केली जात आहे . २००५ मध्ये काही ठिकाणी पहिल्या चार वर्षामध्येच लोकवर्गणी जमा करण्यात येत होती परंतु विलासपूर मधील पाणी योजनेची लोकवर्गणी पुढे तशीच आज पर्यंत जमा करून घेतली जात आहे .
या योजनेचा झालेला ऐकून खर्च किती झाला त्याचबरोबर शासनाकडून किती अनुदान प्राप्त झाले . हा भाग त्रिशंकू भागात त्यावेळी असल्याने प्राधिकरणाने किती लोकवर्गणी भरली याचा ताळमेळ न लावताच २००५ पासून आजपर्यंत लोकवर्गणी प्रत्येक ग्राहकाडून वसूल केली जात आहे . विलासपूर मधील पाणी योजनेची रक्कम वसूल झालेली असताना हि परत वसूल का केली जात आहे . हा ग्राहकांना पडलेला प्रश्न आहे . याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता कोणतीही माहिती दिली जात नाही प्राधिकरणाच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची वेळ काढू उत्तरे दिली जातात .
लोकवर्गणी सोबत भांडवली अंशदानाची रक्कम हि बांधकाम ,सदनिका ,बंगलो , यांच्या बांधकामाच्या चौ. फुटामध्ये वसूल केली जात आहे . ० ते ५०० चौ . फूट बांधकामाला ३००० हजार रुपये तर ५०१ ते १०००चौ.फूट बांधकामाला ५००० हजार रुपये व १००१ ते १५०० चौ.फूट पर्यंत ७५०० रुपये तर १५०१ ते २००० चौ.फूटापर्यंत १०००० हजार रुपये तर २००१ ते २५०० चौ . फुटापर्यंत १२५०० व २५०१ व त्यापेक्षा जास्त चौ .फुटाला १५००० हजार रुपये अशा पट्टित अंशदान रक्कम वसूल केली जाते . एवढ्या मोठ्या रक्कमा भरून नवीन नळ कनेक्शन घेणे शक्य होत नाही . जे कनेक्शन केवळ ३१५० रुपयात मिळते त्या कनेक्शनसाठी २० ते २५ हजार खर्च करणे शक्य होत नाही . ३१५० रुपयांमध्ये सुरक्षा अनामत रक्कम १५००,मीटर तपासणी १०० रुपये ,जोडणी शुल्क ५५०,पाणी बिल सुरक्षा रक्कम १०००अशी ऐकून ३१५० रक्कम होत असताना अनावश्यक खर्च वाढवून ग्राहकांची लुबाडणूक चालवली आहे . हि लुबाडणूक त्वरीत थांबवावी अशी मागणी विलासपूर परिसरातून होत आहे .
या जाचक वसुली विरोधीची तक्रार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे प्रधान सचिव यांच्याकडे विलासपूर मधील नागरिकांनी दिली आहे . कोरोनाच्या काळात प्राधिकरणाकडून अशा अनावश्यक लुबाडणूक थांबावी व प्राधिकरणानी मनमानी कारभार थांबवा अशी मागणी विलासपूर मधून होत आहे . कोरोनाच्या परिस्थितीचा विचार करून लोकवर्गणी व अंशदान रद्द करण्यात यावे अशी मागणी विलासपूर मधून होत आहे .