मौजे.विलासपूर ता .सातारा जि. सातारा येथील पारशी विहीर येथील महाजल कार्यक्रमा अंतर्गत त्रिशंकू भागासाठी(साई सोसायटी.खिडवाडी) ४३९.५० लक्षची पाणी पुरवठा योजना २८.७. २००९ रोजी मंजूर झालेली होती . या पाणी योजनेवर खर्च महाजल कार्यक्रमा अंतर्गत करण्यात आलेला आहे . या रक्कमेच्या पोटी १० टक्के लोकवर्गणी ४३. ९५ एवढी रक्कम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने भरलेली होती असे त्यांच्याकडून सांगण्यात येते . या योजने अंतर्गत साई सोसायटी , व गोळीबार मैदानातील त्रिशंकू भागासाठी पाणी पुरवठा केला जात होता . परंतु नंतर खिंडवाडी ,विलासपूर,संभाजीनगर या भागासाठी हि पाणी पुरवठा या योजने अंतर्गत करण्यास सुरवात झाली . या सर्व भागांसाठी २००९ सालापासून व योजना पूर्ण झाल्यापासून लोकवर्गणी वसूल केली जात आहे . प्राधिकरणाकडून लोकवर्गणीची १० टक्के रक्कम रुपये ४३. ९५ लक्ष गेल्या ११ वर्षात पूर्ण वसूल झालेली असताना ही तशीच पुढे ग्राहकांकडून वसूल केली जात आहे . गेल्या १० ते १२ वर्षात विलासपूर ,खिंडवाडी ,संभाजीनगर ,साई सोसायटी व त्रिशंकू भाग धरून ७ ते ८ हजार नळ कनेक्सन देण्यात आली आहेत . व प्रत्येक पाणी कनेक्सनसाठी ग्राहकांकडून ५००० रुपये लोकवर्गणी जमा केली जात आहे . व तशीच पुढे अजून वसूल केली जात आहे . प्राधिकरणाने लोकवर्गणीची भरलेली रक्कम ४३.९५ लक्ष एवढी वसूल झालेली असताना हि आज पर्यंत ग्राहकांकडून जबरदस्तीने लोकवर्गणी ,अंशदान , रक्कम वसूल केली जात आहे . जे पाणी कनेक्सन ३१५० रुपयात मिळते ते लोकवर्गणी ५००० रु व अंशदान ५००० रु मुळे १३१५० रुपयावर जाते . त्यामुळे लोकवर्गणीच्या नावाखाली जीवन प्राधिकरण ग्राहकांच्या खिशावर दरोडा घालत आहे . आणि करोनात व्यस्त असलेले सरकारला यांच्या कडे पाहण्यास वेळच नाही . त्यामुळे हि दरोडेखोरी कोण थांबवणार हा मोठा घण प्रश्नच आहे .