Friday, August 8, 2025
Homeमहाराष्ट्रलाहोरी बारमधल्या CCTV फुटेजमधून संकेत बावनकुळेसह त्याचे मित्र गायब?

लाहोरी बारमधल्या CCTV फुटेजमधून संकेत बावनकुळेसह त्याचे मित्र गायब?

नागपूर ऑडी कार अपघात प्रकरणारुन राज्यातलं राजकारण चांगलंच तापलं आहे. 9 सप्टेंबरच्या मध्यरात्री एका भरधाव ऑडी कारनं  दोन कार आणि एका बाईकला उडवलं. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर गदारोळ झाला आणि पोलिसांनी या प्रकरणी अर्जुन हावरे चालक आणि रोहित चिंतमवार यांच्याविरोधात रॅश ड्रायव्हिंगच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. मात्र ही कार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या  यांचा मुलाग संकेत बावनकुळे  याची असल्याचं समोर आलं. अपघातावेळी संकेतही ऑडीमध्ये होता हे नंतर पोलीस तपासात समोर आलं.

ऑडी कारने दोन कार आणि एका दुचाकीला धडक दिल्याचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं आहे. पण अपघाताआधी संकेत बावनकुळेसह अर्जुन, रोहित आणि आणखी एक तरुण लाहोरी रेस्टोरेंट आणि बारमध्ये बसले होते. पण पोलिसांनी लाहोरी रेस्टॉरंट आणि बारमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात संकेत बावनकुळे, अर्जुन हावरे, रोनित चिंतमवार आणि आणखी एक तरुण सीसीटीव्ही फुटेजमधून गायब असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज लाईव्ह पाहण्याची सोय आहे. त्याचे रेकॉर्डिंग डीव्हीआर मध्ये स्टोरेज झालेलं नाही.त्यामुळे पोलिसांच्या विशेष पथकाने जेव्हा लाहोरी रेस्टॉरंट आणि बारमधील सीसीटीव्ही फुटेज तपासलं त्यावेळी संकेत बावनकुळेसह इतर तीन तरुण त्यात दिसले नाहीत.

पोलिसांनी लाहोरी रेस्टॉरंट आणि बारमधील डीव्हीआर जप्त करण्या आलं असून डीव्हीआरची फॉरेन्सिक चाचणी केली जाणार आहे. फॉरेन्सिक चाचणीत फुटेज डिलीट केलं आहे की नाही याची माहिती मिळेल असं तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. दरम्यान ऑडी कार अपघातस्थळाचं फुटेज पोलिसांच्या हाती लागलं असून याआधारे पोलीस पुढचा तपास करत आहेत. विरोधकांनी हे प्रकरण चांगलेच लावून धरलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सीताबर्डी पोलीस ठाण्याला भेट दिली होती.

अपघातावेळी ऑडी कारमध्ये अर्जुन हावरे, रोनित चिंतनवार, आणि संकेत बावनकुळे असे तिघेजण बसले होते. संकेत बावनकुळे गाडीत होता, तो वाहन चालवणाऱ्या अर्जुनच्या बाजूला बसला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. अर्जुन आणि रोनीत या दोघांची वैद्यकीय चाचणी केली आहे.. अर्जुन आणि रोनित हे मद्य प्राशन करून होते, अर्जुन वाहन चालवत होता, म्हणून अर्जुन हावरेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments