Friday, August 8, 2025
Homeमहाराष्ट्रलातूरमध्ये 70 वर्षांच्या महिलेवर अत्याचार आणि हत्या...

लातूरमध्ये 70 वर्षांच्या महिलेवर अत्याचार आणि हत्या…

राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या काही दिवसात एकापाठोपाठ एक अत्याचाराच्या घटनांचं सत्र सुरूच आहे. बदलापूरमध्ये दोन चिमुकलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाचं वातावरण आहे. राज्यभरात या प्रकरणाचे पडसाद उमटले असतानाच लातूरमध्ये एका सत्तर वर्षांच्या महिलेवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे. लातूरच्या औसा तालुक्यातील भेटा गावातील ही संतापजनक घटना आहे. महिलेच्या भोळसरपणाचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिची हत्या केली. तीन दिवस या महिलेचा मृतदेह घरातच पडून होता.

लातूरच्या औसा तालुक्यातील भेटा गावातील 70 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करून हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आरोपीची बाहेरगावी  गेली होती. याचा फायदा घेत आरोपी मन्सूर होगाडे महिलेला घरी बोलावलं. 31 वर्षांच्या मन्सूरने 70 वर्षांच्या महिलेवर बलात्कार केला आणि त्यानंतर तिची हत्या केली. तीन दिवसांने आरोपीची आई घरी परतली. घरात महिलेचा मृतेदह पाताच ती हादरली आणि याची माहिती तीने पोलिसांना दिली. याप्रकरणी भादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी तात्काळ तपास सुरु करत आरोपी मन्सूर होगाडेला ताब्यात घेतलं. घटनेने गांभीर्य लक्षात घेता गावात पोलिसांचा मोठा फोजफाटा तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, रत्नागिरीत नर्सिंगचं शिक्षण घेणाऱ्या वीस वर्षाच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. बेशुद्ध अवस्थेत सापडलेल्या या तरुणीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
रुग्णालयातील परिचारिकांनी केला या घटनेचा निषेध केलाय. आरोपीला फाशी झाली पाहिजे या मागणीसाठी शासकीय रुग्णालयातील परिचारिका आणि कर्मचारी काम बंद करून रस्त्यावर उतरले. जिल्हा शासकीय रुग्णालयातील कामकाजही बंद करण्यात आलं होतं.

अकोल्यातील काझीखेड इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत एका नराधम शिक्षकाने मुलींना अश्लील व्हिडिओ दाखवत त्यांचा लैंगिक छळ केला होता. समुपदेशनात मुलींनी हकीकत सांगितल्यावर अकोल्यातील उरळ पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षक प्रमोद सरदारला अटक केली. न्यायालयाने आरोपीला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज पोलिस कोठडी संपल्याने आरोपीला विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून आरोपी शिक्षक प्रमोद सरदार याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments