Saturday, August 9, 2025
HomeMain Newsराज्यातील दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द

राज्यातील दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावीची परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती दिली आहे. तर लवकरच बारावीच्या परीक्षेवर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती देखील टोपे यांनी यावेळी दिली. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत परीक्षेच्या बातमीत एकमताने निर्णय घेण्यात आला आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून अभ्यास करून या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे करता येईल, त्याचबरोबर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना काय आहेत याचा विचार केला जाईल आणि त्याचा निर्णय जाहीर केला जाईल. यासंदर्भात काही तज्ज्ञांशी चर्चा करून, महाराष्ट्र बोर्डासोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

दरम्यान, राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात झाला असून येत्या काही तासांत त्यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येणार असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments