नैसर्गिक आपत्तीमध्ये तसेच पावसामुळे व पूर परिस्थितीत व डोंगराच्या पायथ्या खालील भूभागांमध्ये दरड कोसळून झालेल्या मनुष्यहानी संदर्भीत राजकीय पक्ष कार्यालय सुद्धा कंट्रोल रूम सारखी कार्यान्वित झाली पाहिजेत.
महाराष्ट्रामध्ये प्रचंड पावसामुळे नुकसान होत आहे मुंबईमध्ये दरड कोसळून पाणी भरून लोक मृत्युमुखी पडले आहेत. कोकण पट्ट्यामध्ये तर मोठ्या प्रमाणावर मनुष्यहानी झालेली आहे.
ज्यावेळेस निसर्गाचा कोप होतो आपत्ती येते अशा प्रसंगात राजकीय पक्षांची कार्यालय कंट्रोल रूम सारखी कार्यान्वित झाली पाहिजे. खासकरून मुंबईमध्ये असणाऱ्या पक्ष कार्यालयांनी संबंधित शासकीय यंत्रणेला अलर्ट करत आणि मंत्रालय प्रशासनाला याबाबत सातत्याने अवगत करत राहिला पाहिजे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील पोसरे- बौद्धवाडी व गावांमध्ये झालेल्या घटनेबाबत मी प्रयत्न म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाला सांगण्याचा प्रयत्न केला तर संबंधित आरडीसी नी तात्काळ मला माहिती दिली आणि संबंधीचे संपर्क दिले. मला असं वाटतंय मुंबई मधील झालेल्या घटना असतील किंवा ग्रामीण भागांमध्ये होणारे घटना असतील त्याला तात्काळ मदत,माहिती किंवा प्रशासनाला सदर बाबींमध्ये अवगत करण्यासाठी मुंबई मध्ये असणारे पक्ष कार्यालय एक सामाजिक आणि राजकीय जबाबदारी म्हणून कंट्रोल रूम झाले पाहिजेत. निश्चित पणाने प्रत्यक्ष मदत करता आली तर चांगलंच आहे किंवा आपल्या घरी किंवा ऑफिसमध्ये बसून या पद्धतीची मदत केल्यानंतर निश्चित पणाने अशा या अवघड आणि अडचणी निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये आपल्याला योगदान देता येऊ शकतं, असं मला वाटतं.



