मूल दत्तक घेण्याचीसाठी केंद्र सरकारने CARA ची स्थापना केली आहे . ही संस्था महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करत असते . २०१५ साली दत्तक प्रक्रियेच्या नियमात बदल करण्यात आला .मूल दत्तक घेण्यासाठी सरकारकडून काही अटी पूर्ण कराव्या लागत .
१. इच्छुक पालकांचे शारीरिक,मानसिक ,भावनिक आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम असणं गरजेचे असते .
२. स्वतःचे अपत्य असणारे किंवा नसणारे कोणतेही इच्छुक आई -वडील मूल दत्तक घेण्यासाठी पात्र असतात .
३. लग्नाला दोनहून अधिक वर्ष झालेलेच इच्छुक माता -पिता मूल दत्तक घेण्यासाठी पात्र असतात .
४. मूल दत्तक घेण्यासाठी आई वडिलांचे वय गृहीत धरले जाते .
५. मूल आणि भावी दत्तक आई वडील यापैकी प्रत्येकाच्या वयातले किमान अंतर २५ वर्षांपासून कमी असायला नको .
६. मात्र दत्तक घेणारे इच्छुक आई वडील नातेवाईक किंवा सावत्र असल्यास हा नियम लागू होत नाही .
७. ज्यांना आधीच तीन किंवा त्याहून जास्त अपत्य आहेत ते मूल दत्तक घेण्यासाठी पात्र नसतात . मात्र ,विशेष परस्थिती ते देखील मूल दत्तक घेऊ शकतात .
सर्व अटी आणि कागदपत्रे पूर्ण केल्यानंतर दत्तक प्रक्रिया सुरु होते . यासाठी CARA च्या वेबसाईटवर उपलबद्ध फॉर्म भरून नोंदणी कारवी लागते . दोन साक्षीदार हवे असतात त्यानंतर भावी पालकांच्या शहरात पोलीस व्हेरिफिकेशन होतं . वैद्यकीय आणि विवाहाचा दाखला द्यावा लागतो .
आधीचं अपत्य असल्यास त्याचीही परवानगी घेतली जाते . त्यानंतर पालकांचा राज्याच्या संस्थेशी संपर्क साधला जातो . हि संस्था तुमच्या संपर्कात असते आणि संस्थेत लहान बाळ आल्यावर ती तुम्हाला कळवते . मोठे मुल हवे असल्यास तुम्ही संस्थेत जाऊन मुलं बघू शकता . मुल काही दिवस पालकांकडे राहतं . त्यानंतर आई वडील आणि मूल एकमेकांसोबत आनंदी आहे . कि नाही ,याचा आढावा घेतला जातो .काही अडचण जाणवल्यास मुलाला परत घेतलं जातं . सगळं व्यवस्थित असेल तर शेवट्च्या औपचारिकता पूर्ण करून मूल पालकांना सुपूर्त करण्यात येते .
बालसंगोपन केंद्रात येणारे प्रत्येक मुलं हे त्या बाळाच्या पालकांनी संस्थेत आणून दिलेले असतं अथवा कुठेतरी कुणाला तरी बेवारस सापडलेले असणे . दोन्ही प्रकारात ते बाळ कुठल्या बालसंगोपन केंद्रात दाखल केले जाईल याचा अंतिम निर्णय बालकल्याण समिती घेते . (महिला व बालविकास विभाकडून स्थापन केलीली हि अल्पवयीन मुलांसाठीची समिती आहे . )एकदा संस्थेत मूल आलं की दत्तक प्रक्रिया सुरु करून ते मुल एका कुटूंबाचा भाग होईपर्यंत त्याची संपूर्ण काळजी घेणं यासाठी हि संस्था बांधील असते . जे पालक बाळाला संस्थेमध्ये आणून देतात त्यांच्याकडून एका प्रतिद्न्या पत्रावर सही घेतली जाते . आणि त्यानुसार ६० दिवस या पालकांना बाळ परत घेऊन जाण्यासाठी संधी दिलेली असते . जर मूल हे सापडलेले असेल तर वर्तमानपत्रातून जाहीर नोटीस दिले जाते . ज्यात ६० दिवसांच्या आत त्या बाळाचे पालक येऊन बाळ घेऊन जाऊ शकतात .
मूल संस्थेत आल्यानंतर त्याची पूर्ण वैदयकीय तपासणी करून जरुरी प्रमाणे उपचार सुरु केले जातात . वयाच्या टप्प्यानुसार लसीकरण होते . वरील ६० दिवसाचा कालावधी पूर्ण झाला आणि या काळात त्याचे पालक घेऊन जाण्यासाठी आले नाहीत तर बालकल्याण समिती या मुलाची दत्तक प्रक्रिया सुरु करण्याची परवानगी देते .
गेल्या दोन वर्षांपासून सरकारने पूर्ण दत्तक प्रक्रिया ही ऑनलाईन केलेली आहे . ही प्रक्रिया ‘कारा ‘ या सरकारी विभागाकडून चालवली जाते . सध्याची प्रक्रिया हि मुलं संस्थेत दाखल होऊन दत्तक प्रक्रियेत येण्यापर्यंतचे टप्पे वर सांगितले त्याप्रमाणचे आहेत . पूर्वी पालक जे संस्थेकडे जाऊन आपला अर्ज दयायचे ते आता पूर्णपणे ऑनलाईन प्रक्रियेतूनच होते . यामुळे काही गोष्टी सोप्या झाल्यात तर काही विपरीत परिणाम पण झाले आहेत . थोडेसे या नवीन प्रक्रियाबद्ल जाणून घेऊ या . पूर्वीच्या ज्या दत्तक संस्था होत्या ,त्या सगळ्या आता एसएए म्हणजे (स्पेसल अडॉप्शन एजन्सी ) आहेत . एकदा मूल एसएएमध्ये दाखल झालं की ते ‘कारा ‘च्या ऑनलाईन पोर्टलवर त्या बाळाचे सगळे तपशील भरते . ज्या वेळेस बालकल्याण समिती तर्फे दत्तक प्रक्रियासाठी परवानगी देते . त्या वेळेस हे बाळ त्या पोर्टलवर दत्तक प्रक्रियेकरिता उपलबद्ध आहे ,असं एसएएकडून सांगितले जाते . अधिक माहितीसाठी हि लिंक बघावी http;//www.carain/InnerContent. aspx?Id=१५३#SAA जे पालक दत्तक प्रक्रियेतुन मुल घेऊ इच्छितात ,त्यांनी या ऑनलाईन पोर्टलवर आधी अर्ज करायचा असतो . अर्ज करतेवेळी त्यांना मूल कशा प्रकारचे अपेक्षित आहे ,जसं त्या बाळाचा वयोगट ,लिंग ,व वैद्यकीय दृष्ट्या शारीरिक आरोग्य तसेच कुठल्या एक किंवा तीन राज्यातून किंवा भारतातून चालेल हे सांगावे लागते . अर्ज केल्यानंतर त्या भागातील एसएए या पालकांचा ‘होम स्टडी करून प्रतीक्षा क्रमांक मिळतो . अधिक माहितीसाठी हि लिंक जरूर बघा . http ;//carings.nic .in/parents/parentregshow . aspx ज्या वेळेस दत्तक प्रक्रिया सुरु होते,त्या वेळेस बऱ्याच पालकांना तीन बाळांचे सगळे तपशील आणि वैद्यकीय माहिती दिली जाते . ४८ तासात पालकांना त्यापैकी एका बाळासाठी आपली पंसती देऊन ते ‘कारा ‘पोर्टलवर कळवणे बंधनकारक आहे . पालक संस्थेमध्ये आल्यानंतर District child protection unit (डिसीपीयु ) ऑफिसर, संस्थेचे डॉक्टर आणि कार्यकर्ते पालकांची सगळी कागदपत्रे व त्यातील माहिती याची पडताळणी करून घेतात आणि त्यानंतर बाळाची भेट पालकांसोबत होते . यानंतरची न्यायालयीन प्रक्रिया पूर्वीसारखीच आहे . १. दत्तक प्रक्रियेच्या आधी प्रतीक्षा कालावधी जो एक ते दीड वर्ष होता तो बराच कमी होऊन सहा महिने ते एक वर्ष असा झालय २. सगळे नियम हे ‘कारा ‘पोर्टलवर असल्याने पालकांना सविस्तर माहिती मिळते. ३. या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आली आहे हे जरी फायदे दिसत आहेत .
१६ जानेवारी २०१७ पासून ‘कारा ‘चे नवीन रेगुलेशन अमलात आले आहेत .अधिक माहितीसाठी हि वेबसाईट पाहू शकता .http ;//www.cara.nic.in