सरकारवर टीका केल्यामुळे ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांचे भाषण रोखण्याचा प्रकार घडला आहे. या संपूर्ण प्रकरणा पालेकरांनी आज (१० फेब्रुवारी) पुण्यात पत्रकार परिषद नाराजी व्यक्ती केली. “प्रभाकर बर्वे या चित्रकाराच्या प्रदर्शनासाठी मी नॅशनल गॅलरी ऑफ ऑर्ट (एनजीएमए) येथे गेलो होतो. त्यावेळी मी काय बोलावे किंवा नाही, हा माझा मुद्दा आहे. पण, मी आर्ट गॅलरीचे कौतुक करायचे होते. ते देखील मला करून दिले नाही, सतत मी बोलताना थांबविण्यात आल्याचा आरोप पालेकरांनी एनजीएमएच्या डिरेक्टरवर केला आहे.”