जागतिक दर्जाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वर व पाचगणीचा विकास व संवर्धन होणे आवश्यक आहे .पर्यटनाचे आकर्षण वाढावे ,पर्यटनातून त्या भागाचा विकास व्हावा व त्यातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी मिळून त्यांच्या उपजीविकेचे साधन निर्माण व्हावे यासाठी महाबलेश्वर आणि पाचगणीच्या पयर्टन मास्टर प्लॅनला मंजुरी द्यावी अशी जोरदार मागणी सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत केली . संसदेत लोकहिताचे तातडीचे मुद्यावर चर्चेवेळी बोलताना खा . श्रीनिवास पाटील म्हणाले ,माझ्या लोकसभा मतरदारसंघात ,सातारा जिल्ह्यात पाचगणी आणि महाबळेश्वर हि जागतिक दर्जाची थंड हवेची ठिकाणे आहेत. ही ठिकाणे ब्रिटीस काळापासून गाजलेली आहेत . हि ठिकाणे मनमोहक ,नैसर्गिक दृष्ट्या समृद्ध व आरोग्यदायी अशी आहेत . पूर्वीच्या काळी येथील लोकवस्ती अतिशय थोडी होती . आत्ता लोकसंख्या वाढून ती तिप्पट झाली आहे .
पाचगणी येथे इंग्लिश मेडियम च्या शाळा आहेत . त्या शाळेत भारताच्या सगळ्या क्षेत्रातून विधार्थी येत असतात . मात्र गेली कित्येक वर्ष या भागाचा विकास करण्याकरता पाचगणी आणि महाबलेश्वर नगरपालिकेने जो मास्टर टुरिझम प्लॅन भारत सरकारकडे पाठवला आहे . त्याची कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही . त्यामुळे आहे त्या भागात ,परिस्थितीत सर्व योजना राबवाव्या लागतात . परिणामी येणाऱ्या पर्यटकांना प्रवाशाना अपेक्षित अशी सोयीसुविधा मिळत नाही . त्यांची राहण्याची सोय होत नाही . खेळणी ,घोडे आदी करमणुकीचे प्रकार होत नाहीत . ब्रिटिश काळामध्ये घोड्याच्या पाठीवरून वेगवेगळे पॉईंट बघण्याकरिता राईड्स होत असतात . ते पॉईन्ट ढासळले आहेत , पायऱ्या निखळया आहेत .. त्यामुळे घोड्यावरून पडण्याची संख्या वाढून अपघाताचे प्रमाण हि वाढले आहे .
या ठिकाणच्या संवर्धनसाठी पर्यटन विकासासाठी तसेच सर्वसामान्याच्या खिशाला परवडेल असे पर्यटन स्थळ निर्माण व्हावे ,म्हणून जो मास्टर प्लॅन दिलेला आहे . तो लवकरात लवकर मंजूर करण्यात यावा . त्यातून त्या भागातील स्थानिक सर्वसामान्य माणसांना रोजगार मिळावा ,फळे – फुले विक्री करता यावीत प्रसिद्ध अशी घोड्याची सवारी करता यावी .हा मास्टर प्लॅन मंजूर करण्याकरिता जास्तीजास्त प्रयत्न व्हावेत ,त्यास वन व पर्यावरण मंत्र्यांनी परवानगी द्यावी अशी मागणी खा . श्रीनिवास पाटील यांनी लोकसभेत आज केली .



