Sunday, March 8, 2026
HomeMain Newsमस्करवाडीत शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला

मस्करवाडीत शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला

कराड तालुक्यातील उंब्रज भागात असलेल्या मस्करवाडी येथे शेतात वैरण आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला . त्यांना उपचारासाठी कराड येथे कॉटेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे . शेतात कडबा कापताना मादी जातीच्या बिबट्याने हल्ला केला . बिबट्या मादीसोबत  एक बिबट्याचे पिल्लू असल्याने हल्ला झाला असल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे . घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी ,पुणे – बंगलोर महामार्गावर असलेल्या उंब्रज परिसरातील मस्करवाडी येथे हि घटना आज दिनांक १७ रोजी सकाळी ९. १५ मिनिटाच्या सुमारास घडली रामचंद्र रघुनाथ सूर्यवंशी वय ५५ राहणार मस्करवाडी ता.

कराड असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे . बिबट्याने शेतकऱ्याच्या हाताला चावा घेतला असून तोंडावर नख्या उठलेल्या आहेत , सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित आहेत . रामचंद्र सुरवंशी हे सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास माउली कडी नावाच्या शिवारात जनवारसाठी वैरण आणण्यास गेले होते . कडब्याच्या गंजीच्या आडोशाला बिबट्या होता . त्याने अचानक सूर्यवंशी यांच्यावर हल्ला केला .सूर्यवंशी यांनी बिबटयाशी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्याने बिबट्याने घटनासथळावरून पळ  काढला . या हल्ल्यात जखमी शेतकऱ्यास उपचारासाठी कराड येथील स्व . वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . घटनेची माहिती मिळताच वनविभागाने चोरे येथील वनरक्षक ए . एम . जाधव यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली ,या घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments