Friday, August 8, 2025
HomeUncategorizedभारिप बहुजन महासंघ व महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ...

भारिप बहुजन महासंघ व महाराष्ट्र लोकशाही आघाडीच्या वतीने सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन

भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व लोकशाही आघाडीचे प्रनेते श्री.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शना नुसार महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यात प्रतिगामी गोवंश हत्या बंधी कायद्याला तीव्र विरोध करण्यासाठी आंदोलनाची भूमिका घेतली त्याच अनुषंगाने सातारा जिल्हाधिकारी कार्यालायासमोर तीव्र निदर्शने व आंदोलन भारिपचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत खंडाईत लाल निशाण निकम,शेतकरी श्रमिक संघटनेचे अस्लम तडसरकर,शेतकरी संघटनेचे ज्ञानदेव कदम,बळीराजा शेतकरी संघटनेचे पंजाबराव पाटील ,जिल्हा स्वातंत्र्य सैनिक संघटनेचे भाई पंजाबराव चव्हाण यांच्या नेतृत्वा खाली गोवंस हत्या बंदी कायदा रद्द करण्यात यावा पशुपालकाना पशुपालन भत्ता म्हणून प्रत्येकी ४० हजार रुपये शासनाने द्यावेत त्याच बरोबर अन्यायकारक भूमी अधिग्रहण कायदा रद्ध करण्यात यावा व पोलीस प्रशानाच्या आंदोलन दडपशाहीचा निषेध करण्याच्या मागण्याचे मुख्यमंत्री यांच्या नावे प्रशानाला देण्यात आले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments