Monday, March 2, 2026
Homeदेशभाजप खासदार निशिकांत दुबे याचे पाय धुवून पाणी प्यायला कार्यकर्ता. खासदार म्हणाले...

भाजप खासदार निशिकांत दुबे याचे पाय धुवून पाणी प्यायला कार्यकर्ता. खासदार म्हणाले आदिवासी महिला नेहमी असं करतात.

झारखंड मधील एका कार्यक्रमात भाजप खासदार निशिकांत दुबे याचे एका कार्यकर्त्याने पाय धुतले व ते पाणी पिऊन टाकले यानंतर खासदार दुबे ने स्वतःच्या फेसबुक पेज वर यासंबंधित फोटो व व्हिडीओ सुद्धा अपलोड केले त्यामुळे खासदार दुबेला लोकांनी मोठ्या प्रमाणात ट्रोल करत त्यांच्यावर टीका सुद्धा केली.

निशिकांत दुबे झारखंड मधील गोड्डा चा खासदार आहे. कलाली ते कन्हवारा गावांदरम्यान कझिया नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमात हा संतापजनक प्रकार घडला. भूमिपूजन आटोपल्यानंतर कार्यकर्ता पवन साह याने खासदार दुबे याचे ताटामध्ये पाय धुतले व ते पाणी पिऊन टाकले.

पवन साह या कार्यकर्त्याचे यावर असे म्हणणे होते कि, ‘हा पूल जेव्हा बांधल्या जाणार तेव्हा मी खासदार यांचे पाय धुवून पिणार अशी पूर्वी शपथ घेतली होती, आज या पुलाचे भूमिपूजन झाल्याने मी घेतलेली शपथ पूर्ण केली आहे.’

यावर खासदार निशिकांत दुबे याचे म्हणणे आहे कि, ‘मी ब्राह्मण असल्यामुळे मला टार्गेट केल्या जात आहे, मी सुद्धा माझ्या शिक्षकाचे पाय धुवून पाणी प्यायलो होतो, ते शिक्षक कुर्मी समाजाचे होते. आदिवासी महिला तर नेहमी असचं करतात, महाभारत मध्ये कृष्णाने सुद्धा हे केलं होतं. यात काय चुकीचं आहे? ज्यांना हे चुकीचं वाटतं त्यांची सडलेली मानसिकता आहे.’

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments