ब्रिजभुषण शरण सिंह यांच्यावर सात महिला कुस्ती पटटुंनी लैंगिक छळ केल्याचा आरोप केला आहे ज्यामुळे त्यांच्याविरुद्ध पोलिस स्टेशन मध्ये एफ आय आर देखील दाखल करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की भारत देशातील आॅल्मपिक पदक प्राप्त केलेली बजरंग पुनिया,विनेश फोगाट साक्षी मलिक यांनी भारतीय कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष ब्रिजभुषण शरण सिंह यांच्या विरूद्ध जंतर मंतर वर आंदोलनास प्रारंभ केला होता.
जानेवारी महिन्यात ह्याच तीन कुस्तीपटूंनी ब्रिजभुषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक छळ केल्याचा आरोप सुदधा केला होता.अणि त्यांच्या विरूदध धरणे आंदोलनास बसले होते.
तेव्हा केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने मध्यस्थी केली होती अणि याबाबत तपास करण्यासाठी एक चौकशी समिती नेमली होती.ज्यानंतर ह्या आंदोलनाला स्थगिती देण्यात आली होती.
मागील काही दिवसांपूर्वी देखील ब्रिजभुषण शरण सिंह यांची नार्को टेस्ट करण्यात यावी अशी मागणी करत हे तिन्ही कुस्तीपटटु आंदोलनाला बसले होते.
विनेश फोगाट हिची अशी प्रतिक्रिया होती की ह्या प्रकरणासाठी तपास करायला जी चौकशी समिती नेमण्यात आली होती यांच्यात देखील राजकीय संगनमत आहे.आता आम्ही जगु अणि मरू देखील जंतर मंतर वर देशालाही कळायला हवे आमच्यासोबत काय घडले आहे.
विनेश फोगाट हिचे असे मत आहे की आॅल्मपिक मध्ये प्रतिनिधित्व करणारया अणि काॅमन वेल्थ मध्ये सुवर्णपदक प्राप्त करणारया खेळाडु सुरक्षित नाहीये तर मग इतर महिलांचे कसे होणार असा प्रश्न विनेश फोगाट हिने उपस्थित केला होता.
साक्षी मलिक यांनी देखील असे म्हटले होते की पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करून देखील ब्रिजभुषण शरण सिंह यांच्यावर एफ आय आर दाखल करण्यात आलेली नव्हती.
पण शुक्रवारी २८ एप्रिल २०२३ ब्रिजभुषण शरण सिंह यांच्याविरुद्ध एफ आय आर नोंदविण्याचा निर्णय अखेरीस घेण्यात आला आहे.
आपल्यावर एफ आय आर नोंदविण्यात आलेल्या ब्रिजभुषण शरण सिंह यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे की मी सुप्रीम कोर्टाने घेतलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो अणि दिल्ली पोलिसांना सदर प्रकरणा बाबद चौकशी करण्यासाठी माझ्या वतीने मी प्रयत्न देखील करेल.
आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या भारत देशाचे नाव उज्वल करणारे हे खेळाडू मागील सहा ते सात दिवसांपासून जंतर मंतर वर उन्हा तान्हात धरणे आंदोलनास बसले आहेत.
ब्रिजभूषण शरण सिंह हे भाजपकडून 16व्या लोकसभेसाठी कैसरगंज लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार आहेत.
ब्रिजभुषण शरण सिंह हे आतापर्यंत सहा वेळा लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आहेत.अणि सध्या ते भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष देखील आहेत.