Friday, August 8, 2025
HomeMain Newsबाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण, दिग्गजांच्या उपस्थितीत सोहळा

बाळासाहेबांच्या पुतळ्याचं अनावरण, दिग्गजांच्या उपस्थितीत सोहळा

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गजांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. बाळासाहेब ठाकरे यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त या पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं. बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात आला आहे.

यावेळी  मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्य़क्ष शरद पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

राज्याच्या जडणघडणीचा शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान मोठं आहे. बाळासाहेब ठाकरेंचा पूर्णाकृती पुतळा कुलाबा परिसरातील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचे लोकापर्ण आज त्यांच्या 95 व्या जयंतीला  करण्यात आलं.

हा पुतळा दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस या इमारतीसमोर डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये उभारण्यात आला आहे. शिवसेनाप्रमुखांचा उभारण्यात आलेला हा पहिलाच भव्य पुतळा आहे. 9 फूट उंच आणि 1200 किलो ब्राँझ धातूपासून या पुतळ्याची निर्मिती करण्यात आली आहे. प्रबोधन प्रकाशनाच्या वतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली आहे. ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकारला आहे.

बाळासाहेबांचे निकटचे स्नेही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. तर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची विशेष  उपस्थिती आहे.  महापौर किशोरी पेडणेकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  होत्या.

 नोव्हेंबर 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांच्या गळ्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची माळ पडली. उद्धव ठाकरे यांच्या शपथविधीचा सोहळा शिवाजी पार्कात घेण्यात आला. या सोहळ्याला देशभरातले प्रमुख नेते उपस्थित होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही या सोहळ्याचं निमंत्रण होतं. राज ठाकरे यांनीही या सोहळ्याला उपस्थिती लावून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर राज-उद्धव एका मंचावर आलेले नव्हते. त्यानंतर आज दुसऱ्यांदा उद्धव-राज जवळपास पंधरा महिन्यांनी एका मंचावर आले. बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष यशोधर फणसे यांनी ऑक्टोबर 2015 ला गटनेत्यांच्या बैठकीत मांडला. दक्षिण मुंबईत गेटवे ऑफ इंडिया जवळील रिगल सिनेमा, छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय, महाराष्ट्र पोलीस महासंचालक कार्यालयासमोरील चौकात बाळासाहेबांचा पुतळा उभारला जाणार होता. मात्र ही जागा छोटी असल्याने पुतळ्याची जागा बदलण्यात आली.

स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केलेल्या मागणीनुसार हा पुतळा आता दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस या इमारतीसमोर डॉ.शामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटामध्ये उभारण्यात आला आहे. 9 फूट उंचीचा पुतळा, 2 फूट उंच हिरवळ (लँडस्केप), चबुतरा सह 11 फूट उंच पुतळा उभारण्यात आला आहे.

गेले काही वर्ष हा पुतळा लालफितीत अडकला होता. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या महाआघाडीचे सरकार सत्तेवर येताच हा पुतळा उभारण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या देण्यात आल्या आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments