Friday, August 8, 2025
HomeMain Newsबस चालू ठेऊन चालक चहा प्यायला गेला बस गेली रिक्षावर

बस चालू ठेऊन चालक चहा प्यायला गेला बस गेली रिक्षावर

सातारा शहरातील राजवाडा बस स्थनाकावरील कर्नाटक राज्यातील बस उतारास लागल्याने थेट बस स्थानकासमोर उभ्या असलेल्या रिक्षावर जाऊन धडकली . यामुळे दोन रिक्षांचा चुराडा झाला . या घटनेत रिक्षा चालक जखमी झाला आहे . हि घटना आज सकाळच्या सुमारास राजवाडा परिसरात घडली . घटनासथळावरून मिळालेल्या  माहिती नुसार राजवाडा बस स्थानकावर कर्नाटक राज्याची बस उभी होती . हि बस चालू अवस्थेत उभा करून चालक चहा पिण्यासाठी गेला होता . बसचा  हॅन्ड ब्रेक फेल झाल्याने बस उतारामुळे पुढे गेली . या बसस्थानकाच्या बाहेर बरीच वर्धळ  असते . बरेच प्रवासी या ठिकाणी उभे असतात . त्याचबरोबर या बसस्थानकाच्या बरोबर समोर रिक्षा थांबा आहे . या ठिकाणी नेहिमी प्रमाणे रिक्षाच्या रांगा  लागलेल्या होत्या . या बस ने दोन रिक्षांना धडक दिल्यामुळे दोन्ही रिक्षाचा चुराडा झाला आहे . दरम्यान बस चालकाने पळत येऊन बसमध्ये बसल्याने पुढचा अनर्थ टळला . येथील नागरिकांनी वाहक  व चालक  दोघाना मारहाण केली .सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही . सातारा पोलीस घटनेचा तपास करीत आहेत .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments