Friday, August 8, 2025
Homeमहाराष्ट्रबदलापूरसारखाच प्रकार पुण्यात! स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचार

बदलापूरसारखाच प्रकार पुण्यात! स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचार

बदलापूर येथील नामांकित शाळेत दोन अल्पवयीन चिमुरडींवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतानाच पुणे येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यात चालत्या स्कुल बसमध्ये बस चालकाने दोन अल्पवयीन चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केल्याचा विकृत प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पुण्यातील वानवडी परिसरातील हा धक्कादायक प्रकार आहे. 45 वर्षीय व्यक्तीवर या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, एका नामांकित शाळेतील विद्यार्थ्यांसोबत हा प्रकार घडला आहे. आरोपी हा या शाळेतील विद्यार्थ्यांना बसमधून शाळेत सोडण्याचे व आणण्याचे काम करतो. बसमध्ये दोन्ही चिमुरडी या पुढच्या सीटवर बसतात. बस चालकाने सहा वर्षांच्या चिमुरडीसह तिच्या मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार केला. गेल्या चार दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. अत्याचार प्रकरणी 45 वर्षीय नराध्यम स्कूल बस चालकावर वानवडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा चालत्या बसमध्ये चिमुरडींसोबत अश्लील चाळे करत होता. दोन्ही चिमुरडीना जवळ बसून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. बदलापूरच्या घटनेनंतर पुण्यातील धक्कादायक प्रकाराने शहरात मोठी खळबळ माजली आहे.

अल्पवयीन चिमुरडी घरी परतल्यानंतर तिला प्रायव्हेट पार्टच्या ठिकाणी वेदना होत होत्या. त्यानंतर मुलीच्या आईने तिची विचारपूस केली. तेव्हा तिने तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार आईला सांगितला. चिमुकलीने या सगळा प्रकार घरी सांगितल्यानंतर उघडकीस आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments