Sunday, March 8, 2026
HomeMain Newsपिंपोडे बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जमावाकडून तोडफोड

पिंपोडे बुद्रुक येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जमावाकडून तोडफोड

कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक ग्रामीण  रुग्णालयात जमावाने तोडफोड केल्याची घटना मंगळवारी दिनांक १५ रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली . तसेच जमावाने रुग्णालयाची तोडफोड करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला . याबाबत रुग्णालयाच्या वैदयकीय अधिकाऱ्यांनी वाठार पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे . याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि ,वाघोली( ता . कोरेगाव ) येथील रोहित पोपट शिंदे (वय २६ ) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती . आत्महत्येची घटना उघडकीस आल्यानंतर रात्री सडे दहा वाजण्याच्या सुमारास त्या युवकाला वाघोली येथील काही युवक व नातेवाईक उपचारासाठी पिंपोडे बुद्रुक येथील खाजगी दवाखान्यात घेऊन गेले होते . तेथील डॉक्टरांनी त्याचा मुर्त्यू झाल्याचे सांगितले . तेव्हा त्या ठिकाणी नातेवाईकांच्या जमावाने गोंधळ घातला . नंतर पुन्हा मुर्त्यू झालेल्या युवकाला घेऊन जमाव ग्रामीण रुग्णालयात गेला . तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरनी त्याचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांना सागिंतले . त्यावेळी संतप्त झालेल्या जमावाने रुग्णालयातील केबिनच्या काचा फोडल्या ,सॅनिटाझर  मशीन फोडले . महिला प्रसूती ग्रहाच्या खोलीचा दरवाजा फोडला ,तसेच दवाखान्यात प्रचंड गोंधळ घातला , रुग्ण सेवेसाठी उपस्थित असलेले डॉक्टर व महिला कर्मचारणावर घीही जमावाने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला .

सातारा तालुक्यातील कुमठे येथे दोन दिवसापूर्वीच रात्रीच्या वेळेस एकाने दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता . त्यानंतर आता कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे येथेही जमावाने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला . अशा प्रकारच्या गुन्हेगारी प्रव्रुत्तीना आळा घालण्यासाठी आरोग्य केंद्रांना पोलिसांनी सरक्षण देणे गरजेचे आहे . तसेच गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी वैद्यकीय क्षेत्रातुन केली जात आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments