Saturday, August 9, 2025
HomeMain Newsनैसर्गिक आपत्तीचा कास पठाराला धोका

नैसर्गिक आपत्तीचा कास पठाराला धोका

अलीकडील काही वर्षात नैसर्गिक आपत्तीच्या घटना  मोठ्या प्रमाणावर घडत आहेत . अशातच कास पठार हे उंच डोंगराळ  भागावरती आहे . सततच्या मानवी हस्तक्षेपामुळे नैसर्गिक समतोल ढासळत आहे . याच पठारावरील नियमबाह्य  हॉटेल बांधकामाची  संख्या मोठ्या प्रमाणावर आहे . सातारा तालुक्यातील डोंगर कपारीमध्ये व धरण  क्षेत्रामध्ये अनेक हॉटेल व्यवसायिकांनी  बेकादेशीर बांधकामे केली आहेत.

कास हे ठिकाण सातारच्या पश्चिमेस २३ किलोमीटर अंतरावर आहे . या पठारावर पावसाळा सुरु झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले येतात .   या पठारावर अनेक फुलांच्या दुर्मिळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा २०१२ साली युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या  संरक्षित यादीत समावेश करण्यात आला . आणि सर्व लोकांच्या नजरा व्यवसायाच्या दृष्टीने कासकडे वळल्या,कास पठार हे रेड झोन मध्ये आहे . अशा ठिकाणी कोणताही  व्यवसाय किंवा बांधकाम करण्यास परवानगी नाही . तरी पण सातारा व सातारा बाहेरील  व्यावसायिकानी  या ठिकाणी बेकादेशीर रित्या अनेक हॉटेल बांधकामे केली आहेत . अशा प्रकारे बेकादेशीर बांधकामनांमुळे  नैसर्गिक आपत्तीला दिलेले आमंत्रणच आहे . मागील काही वर्षात प्रशासनाकडून कास परिसराती  अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा  प्रयत्न्न  केला पण तो स्थानिक लोकप्रतिनिधींनी  लोकांच्या उपजीविकेच्या नावाखाली  हाणून  पाडला . वास्तविक पाहता कास पठारावरील किती ग्रामस्थांना रॊजगार मिळाला हा संशोधनाचा विषयच ठरेल . कारण या भागात झालेली किंवा केलेली अनधिकृत बांधकामे हि स्थानिक लोकांची नसून ती बाहेरील लोकांनी जमिनी विकत घेऊन केलेली आहेत . त्यामुळे स्थानिक लोकांच्या उपजीविकेचा विषयच येत नाही . महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यपैकी  कास पठार हे एक आश्चर्य मानले जाते . कास पठाराला हॉटस्पॉट हे नाव दिल्यामुळे या पठाराच्या  परिसरात मानवी हस्तक्षेप वाढला आहे . पर्यटकांचा ओघ प्रचंड प्रमाणात वाढल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत . कास परिसरात यवतेश्वर ते कास मार्गावर १०० च्या वरती अवैध बांधकामे आहेत . हि बांधकामे कासच्या जैवविविधतेला बाधा आणत  आहेत . त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीला सुद्धा आमंत्रण देत आहेत . अशा बांधकामांमुळे प्रदूषण होत असल्याने त्यांचा नैसर्गिक जैवविविधतेवर परिणाम होत आहे . एका बाजूला जैवविविधता वाढवी यासाठी  शासन प्रयत्त्न करीत आहेत तर दुसऱ्या बाजूला अशा बेकादेशीर बांधकामांना अभय देत आहे . कास परिसरात यवतेश्वर ते कास मार्गावर १०० च्या वरती अवैध बांधकामे आहेत . हि बांधकामे कासच्या जैवविविधतेला बाधा आणत  आहेत . त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीला सुद्धा आमंत्रण देत आहेत . अशा बांधकामांमुळे प्रदूषण होत असल्याने त्यांचा नैसर्गिक जैवविविधतेवर परिणाम होत आहे .

कास पठाराच्या परिसरात अनेक ठिकाणी डोंगर कपारीच्या बाजूला लोकेशनच्यासाठी बांधकामे केली आहेत . त्यामुळे भविष्यात जर नैसर्गिक आपत्तीनमुळे  दरडी ढासळण्याच्या घटना घडल्या ,तर मोठा धोका निर्माण होऊ शकतो . बऱ्याचदा अशा बांधकामांमुळे वन्यजीवांना हि धोका निर्माण झालेला आहे . त्यांच्या वावरण्यावर मर्यादा येत आहेत . पर्यटनाच्या नावाखाली हुल्डबाजी या परिसरात नित्यनेमाने चालू आहे . त्यामुळे  निसर्गाला हानी पोचत आहे . प्रशासनाने या मध्ये लक्ष घालून डोगरांच्या कडेच्या  व कास परिसरातील  बेकादेशीर हॉटेल बांधकामांवर कारवाई करावी . हे बेकादेशीर बांधकामे पाडून  टाकावीत . पर्यटनाच्या नावाखाली चालू असलेल्या बेकादेशीर घटनांना पायबंद घालावा . तेव्हाच कास मोकळा श्वास घेईल.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments