Sunday, August 10, 2025
HomeMain Newsदेशभक्त किसन वीर यांनी येरवडा तुरुंग फोडल्याच्या घटनेला आज ७७ वर्षे पुर्ण

देशभक्त किसन वीर यांनी येरवडा तुरुंग फोडल्याच्या घटनेला आज ७७ वर्षे पुर्ण

स्वातंत्र्यचळवळीत ब्रिटिशांविरोधी संघर्ष करताना शीर हातावर घेऊन आंदोलनात उडी घेतलेल्यांमध्ये सातारा जिल्ह्यातील किसन वीर यांचे नाव घ्यावेच लागेल.क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारमध्ये वाई गटाचे गटप्रमुख असलेल्या किसन वीर यांचेसह त्यांच्या पाच सहकाऱ्यांनी येरवडा केंद्रीय कारागृहाच्या भिंती वरून उड्या मारून पलायन केले . या घटनेला दि १ नोव्हेंबर २०२० रोजी ७७ वर्षे पूर्ण होत आहेत . या क्रांतीकारकांना स्वातंत्र्योत्तर काळात विसरून कसे चालेल.?

संपूर्ण देशाला अभिमानास्पद असे स्वातंत्र्य चळवळीत प्रतिसरकार व त्यात निधड्या छातीने सहभागी झालेले स्वातंत्र्य सैनिकांचे कार्य आहे. १९४२ च्या चले जाव चळवळीचे अमृतमहोत्सवी वर्ष होवून गेले आहे. सातारा जिल्ह्यातील प्रतिसरकारची चळवळ , स्वातंत्र्यचळवळीतील योगदान याला दैदिप्यमान इतिहास आहे. अनेक ज्ञात- अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या घरादाराचे , कुटुंबाचे काय होईल याकडे लक्ष न देता इंग्रजांच्या गुलामगिरी मधून देशाला मुक्त करण्यात स्वतःला धन्य मानले. त्यातच सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील किसन वीर यांच्या कार्याचा गौरवाने उल्लेख करावा लागेल. प्रतिसरकार चे अर्ध्वयू क्रांतिसिंह नाना पाटील , यशवंतराव चव्हाण , दिनकरराव निकम , बाबुजी पाटणकर , कॉ शेख काका , पांडू मास्तर , छन्नुसिंग चंदेले , कॉ विभूते , वसंतदादा पाटील , यांच्या सहकार्याने आणि प्रतिसरकार मधिल विविध गटाच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळीत किसन वीर यांनी १९४२च्या भुमिगत आंदोलनामध्ये आपल्या कार्याचा इंग्रज सरकारच्या अधिकारी मंडळीमध्ये दबदबा निर्माण केला होता. ब्रिटिश सरकारविरोधात जनमत जागृत करण्यासाठी तत्कालीन सातारा जिल्ह्यात नाना पाटील , यशवंतराव चव्हाण , नागनाथअण्णा नायकवडी , जी डी बापू लाड , किसन वीर , सोपानराव घोरपडे , बाबुरावजी जंगम आदी असंख्य ज्ञात अज्ञात धुरिणांनी जाहीर सभा , मेळावे , परिषदा ,मिरवणुका , मोर्चे , आदिंनी रान ऊठवले . जिल्ह्यात १६७ मिरवणुका , १४८ प्रचार सभा झाल्या. जिल्ह्यात एकुण ७८ लहान मोठे मोर्चे निघाले.यावेळी अनेकांना अटका झाल्या .

भुमिगत चळवळीने देशात इंग्रज सरकारला हादरून सोडले होते. इंग्रज सरकारने अनेक स्वातंत्र्य सैनिकांना वेगवेगळ्या तुरुंगात अटक करून ठेवले होते. सातारा जिल्ह्यातील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक किसन वीर व त्यांच्या सहकारयांना दि १८ सप्टेंबर १९४२ रोजी अटक करुन येरवडा केंद्रीय कारागृहात ठेवले होते. भुमिगत आंदोलन सुरू ठेवावे असे त्यांना मनोमन वाटत होते.. ते तुरुंगातुन निसटून जाण्याची संधी पहात होते. तुरुंगाच्या पहारेकरयाला डॉ तुळपुळे यांनी फितूर केल्याने पोलिसांना चुकवून किसन वीर यांनी आपले सहकारी स्वातंत्र्य सैनिक छन्नुसिंग चंदेले , पांडुरंग गणपती पाटील ऊर्फ पांडु मास्तर , भाई ल.पै. विभुते आणि बलदेव प्रसाद अशा सहकरयांसह दि १ नोव्हेंबर १९४२ रोजी येरवडा जेलच्या भिंतीवरून उड्या मारुन पळाले. या घटनेला दि १ नोव्हेंबर २०२० रोजी ७७ वर्षे पुर्ण होत आहेत. क्रांतिकारक सलाम या क्रांतिकारकरांना .

किसन वीर यांचा सातारा जिल्ह्याच्या राजकारणात स्वातंत्र्योत्तर काळातही दबदबा कायम होता. खासदार , आमदार या पदापर्यंत ते गेलेही. सहकार , राजकारण , यात त्यांनी त्यांचे वेगळे स्थान निर्माण केले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments