पाटण तालुक्यातील तारळे येथील वरच्या पेठेत ९० वर्षीय महिला कोरोना बाधित तीन दिवसापासून आढळून आली . ती दोन खणाच्या घरातच कुटूंबियांच्या समवेत असून प्रशासन त्यांच्या मुर्त्यूची वाट पाहते का ? आणखी कुटंबातील लोकांना बाधित होण्याची वाट प्रशासन बघते आहे का ? असे प्रश्न कुटूंबियांना पडत असून डॉक्टर फिरकेनात ना कोणी विचारपूस करेना ,अशी अवस्था ग्रहराज्यमंत्री शुंभुराज देसाई याच्याच तालुक्यातील आहे .
पाटण तालुक्यातील तारळे भागात कोरोना बाधित रुग्नाचा आकडा वाढताना दिसत असून हि या बाबींकडे प्रशासन दुर्लक्ष का करीत आहे. जिल्ह्यात कोणत्याही रुग्नालयात बेडच शिल्लक नाहीत . दुसऱ्या बाजूला होम आयसोलेशनची तारांबळ उडत आहे .
गेल्या तीन दिवसापूर्वी तारळे येथील वरच्या पेठेत ९० वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉसिटीव्ह आला . या महिलेच्या घरामध्ये मुलगा ,सून ,व दोन नातवंडे राहतात . घरात वेगळी कोणतीच सोय नसताना हि त्या बाधित रुग्णास घरातच ठेवण्याचा सल्ला देण्यात आला. गेल्या तीन दिवसापासून ती महिला वेदनेने तडफत आहे . परंतु आरोग्य खात्याचा एक हि माणूस इकडे फिरकालच नाही . अशा अवस्थेमुळे घरातील सर्व लोक भयभीत झाले आहेत . साधी गोळी द्याला किंवा विचारणा करण्यास हि कुणी आलेले नाही . उपचाराविना जा घरी रुग्णांची अशी अवस्था होणार असेल तर शासन यातून काय साध्य करणार आहे . आपले कुटूंब आपली जबादारी नुसते नावालाच राहणार आहे . याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून रुग्णाची होणारी हेळसांड थांबवावी .