सातारा शहर व परिसरातील उपनगरात दुषित पाणी पुरवठा होत असल्याने ऐंन उन्हाळ्यामध्ये साथीच्या आजाराने थैमान घातले आहे .सातारा शहराच्या आसपासच्या परिसरातील काविळीच्या रुग्णांनमध्ये वाढ होत आहे .रोज दोन ते चार काविळीचे रुग्ण दवाखान्यात दाखल होत आहेत .विलासपूर ग्रामपंचायत हदीमध्ये गेल्या दोन महिन्यात 30 पेक्षा जास्त लोकांना काविळीची बाधा झाली आहे .आणि ही परीस्थितीत केवळ दुषित पाणी पुरवठ्यामुळे झालेली दिसत आहे .या दुषित पाणी पुरवठ्याला प्राधिकरणच जबाबदार आहे .महाराष्ट जीवन प्राधिकरण मार्फत दररोज शहर व परिसरात पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या जलवाहिन्या जुन्या असल्याचे अनेक ठिकाणी त्या जलवाहिन्यांना गळती लागली आहे .या जलवाहिन्यात गटाराचे व साडपाणी जात आहे .त्याचमुळे दुषित पाणीपुरवठा होत आहे .नागरिकांनी वेळोवेळी प्राधिकरणाकडे दुषित पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार करून हि संबधित कार्यालयातील अधिकारी कोणतीच उपयायोजना करताना दिसत नाहीत .काविळीच्या रुग्ण संख्येत वाढच होत आहे .विलासपूर मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने पक्के गटार बांधणीसाठी खोदलेल्या खड्यातच पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईप लाईनमध्ये गटाराचे पाणी पाईपलाईनमध्ये मिसळत आहे .
सातारा जीवन प्राधिकरणाचा गोंधळ ऐवढा मोठा आहे.कि यामध्ये नागरिकाच्या कोणत्याही समस्यावरती उपया निघेल अशी परिस्थीती नाही .मुख्य अभियंता हे चार महिन्यांनी निवृत्त होणार असल्याने ते कोणतीही कारवाई करताना दिसत नाहीत .त्याच बरोबर सहाय्यक अभियंता म्हणून काम करणारे लोक हे नवीन असल्याने त्यांना हि या कामामध्ये दुसऱ्यावरती अवलंबून राहावे लागते.नवीन नळ कनेक्शनसाठी तर ग्राहकांची लूटच होत आहे .जाणीव पूर्वक ग्राहकांना पिळण्यात येत आहे .जे कुणी पैसे देणार नाही त्या ग्राहकांना हेलपाटे घालून नवीन कागदपत्रे मागून परेशान केले जाते .या कार्यालयातील नळ कनेक्शन साठी नेमणूक केलेले क्लार्क हे मनाला येईल एवढे पैसे सांगत असतात त्यामध्ये जो राजी होईल त्याचे काम केले जाते ,जो कुणी पैसे देणार नाही त्यांना हेलपाटे हे ठरलेले आहेत
खाजगी ठेकेदारणा प्राधिकरनाची कामे दिली जातात. कारण या ठेकेदारांकडून हप्ते दिले जातात.प्राधिकरणाचे अधिकृत असणारे प्लंबर १६ ते १७ असून या प्लंबर लोकांकडून हप्ते वाढवून देत नाही म्हुणुन त्यांचे परवाने नूतनीकरण करून दिले नाहीत .जीवन प्राधिकरणातील गोंधळ ऐवढा मोठा आहे कि या कार्यालयाला शासकीय स्वरूपच राहिलेले नाही. सगळा सावळा गोंधळ आहे .मुख्य अभियंता राहत असलेल्या ठिकाणचे नळ कनेक्शनच बेकादेशीर निघाल्यावरती सर्वसामान्यचे काय हा प्रश्न निर्माण होतो आहे .या बाबत कुणी हि लक्ष दयायला तयार नाही नाहीत .कारण यांना हप्ते पोचविले जातात तर काही लोक राजकीय पक्षाचे असल्याने त्यांना कुणी हि हलविण्याचे धाडस करीत नाही .या सगळ्या गोंधळात प्राधिकरणाला कंटाळलेले ग्राहक मात्र वाऱ्यावरती दिसत आहे .