Friday, August 8, 2025
HomeMain Newsजातीपातीच्या आधारावर निवड न करता मनातील भावना ओळखून सहजीवन जोडीदाराची निवड केल्यास...

जातीपातीच्या आधारावर निवड न करता मनातील भावना ओळखून सहजीवन जोडीदाराची निवड केल्यास जीवन सफल होईल – मा. शिवाजी जाधव

एच.आय.व्ही. संसर्गित व्यक्तीनी योग्य पद्धतीने आहार, उपचार घेतल्यास आरोग्य स्थिती उत्तम रहाते. आपण कोणत्याही गोष्टीचा विचार न करता मानसिक संतुलन योग्य ठेवल्यास शंभर वर्षी  आयुष्य आपण जगू शकतो. अे. आर. टी. उपचार पद्धतीमध्ये अनेक नवे  नवीन प्रयोग करून एच. आय. व्ही. संसर्गीताचे जीवन सूकरीत करण्याचे काम शासनाकडून होत आहे. एच. आय. व्ही. संसर्गीत व्यक्तींमध्ये  समायोजन,  अडथळे, संवाद, हलगर्जीपणा आणि शिक्षण यांमध्ये  समन्वय नसेल तर आयुष्याचे नुकसान होवू शकते. एच. आय.व्ही. संसर्गित व्यक्तीनी जातीपातीच्या आधारावर निवड न करता मनातील भावना ओळखून सहजीवन जोडीदाराची निवड केल्यास जीवन सफल होईल, असे प्रतिपादन  जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिवाजी जाधव यांनी केले.

जागतिक एच. आय. व्ही./एड्स  सप्ताहनिम्मित स्नेहालयाने आयोजित केलेल्या सहजीवनाची ओढ असणाऱ्या एच.आय.व्ही./एडस  संसर्गितांसाठी  राज्यस्तरीय वधू – वर परिचय मेळावा कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विक्रम पानसंबळ (वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, ए,आर,टी. सेंटर, जिल्हा रुग्णालय), डॉ. श्रद्धा बिरादार (वैद्यकीय अधिकारी, ए,आर,टी. सेंटर, जिल्हा रुग्णालय), मा. प्रवीण मुत्याल (सदस्य, बाल कल्याण समिती, अहमदनगर), मा. प्रशांत येंडे (संचालक, विहान प्रकल्प, अहमदनगर), मा. दगडू लोमटे (सामाजिक कार्यकर्ते तथा प्रणेते भारत जोडो आंदोलन, अंबेजोगाई, बीड), डॉ. ऋषिकेश खिलारे (सामाजिक कार्यकर्ते, मेळघाट),  सदस्य उपस्थित होते तसेच मा. विनय इदे  (समुपदेशक, पी.पी.टी.सी.टी. केंद्र, अहमदनगर), मा. अनिल गावडे (वरिष्ठ सहसंचालक, स्नेहालय) मा. भरत कुलकर्णी   (संयोजक, स्नेहालय, अहमदनगर), मा. विद्या घोरपडे (प्रकल्प व्यवस्थापक, स्नेहाधार प्रकल्प) आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मा. प्रशांत येंडे  यांनी महाराष्ट्रातील एच.आय.व्ही./एडस संसर्गित व्यक्तींच्या सद्यस्थिती बाबत माहिती देवून त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी शासनाने अनेक उपक्रम हाती घेतले आहे.  प्रत्येकाने मनामध्ये भीती न बाळगता आपले सहजीवन जोडीदार योग्य पद्धतीने निवडावे असे आवाहन केले.  मा. दगडू लोमटे यांनी आपले दुख हेच आपले सौंदर्य आहे. आपण आपले दुख न लपवता खुलेआमपणे त्याचा स्वीकार करून पुढील उज्ज्वल आयुष्य जगले पाहिजे, असे सांगितले. मा. प्रवीण मुत्याल  यांनी  आपल्या प्रस्ताविकतेत एच.आय.व्ही./एडस संसर्गित व्यक्तींसांठी स्नेहालय संस्थेमार्फत राबवीत असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. यामध्ये मुख्यतः केरिंग फ्रेडस हॉस्पीटल अँड रीसचँँ सेंटर मार्फत पुरविल्या जाणाऱ्या  सेवा – सुविधा व भविष्यकालीन नियोजनाबाबत माहिती दिली. एच.आय.व्ही./एडस संसर्गित व्यक्तींना कोणत्याही शासकीय योजनांसाठी कोणतीही मदत हवी हवी असल्यास त्वरित  बाल कल्याण समितीकडे संपर्क साधण्याचे विनंती  त्यांनी केले. राज्यस्तरीय वधू -वर परिचयात  राज्यातील विविध जिल्ह्यातील ४००   पेक्षा जास्त  एच.आय.व्ही. संसर्गितांनी आपली नावनोंदणी केली. एच.आय.व्ही. संसर्गित व्यक्तींसोबत आलेल्या नातेवाईकांची संख्या लक्षणीय होती. राज्यस्तरीय वधू – वर परिचयात निवड झालेल्या ७   जोडीदारांचे येत्या १५ डिसेंबर २०२१   रोजी सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती स्नेहाधार प्रकल्पाच्या प्रमुख विद्या घोरपडे  यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती रामदिन यांनी केले तर उपस्थितांचे आभार विद्या घोरपडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन पवार, सागर फुलारी, प्रवीण धाड, विष्णू कांबळे,  कावेरी रोह्कले,  नीता पटेकर, पल्लवी निकम, आसावरी देशपांडे, प्रतीक्षा खडसे,  दिपक बुरम, आकाश काळे, फिरोज पठाण, अशोक चिंधे, संदीप क्षीरसागर,  अशोक अकोलकर, राजेंद्र शिंदे, राहुल लवांडे आणि संदीप खरात आदींनी परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments