कोरोनामुळे मुर्त्यूमुखी पडलेल्या दोन पोलीस कर्मचारांच्या वारसांना जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या हस्ते धनादेश वाटप करण्यात आले , वाई पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असणारे गजानन ननावरे व रहिमतपूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणारे हवालदार आनंद गोसावी या दोघांचा उपचारा दरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाला . या दोन्ही घटनांमुळे पोलीस दल हादरून गेले होते . दोन्ही कर्मचाऱयांच्या मृत्यू नंतर वारसांना शासनाकडून दिले जाणारे ५० लाख रुपयांचे अनुग्रह अनुदान जिल्हा पोलीस या अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पाठपुरावा करून मिळवून दिले . कोरोनाच्या लढाईत पोलीस दल गेली सहा महिने काम करीत आहे . पुरेशी खबरदारी घेऊन हि अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे . परंतु त्यांनी घाबरून जाऊ नये पोलीस दल त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे .असे तेजस्वी सातपुते यांनी सांगितले .