कोरोनामुळे आई वडिलांचा मुर्त्यू झाल्यामुळे अनाथ झालेल्या बालकांच्या भवितव्याची जबाबदारी शासनाने घेतली आहे . सातारा जिल्ह्यातील अशा १४ अनाथ बालकांना एकरकमी पाच लाख रुपयांचे मुदत ठेव प्रमाणपत्र व अनाथ प्रमाणपत्र वितरण आज जिल्ह्याधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते महिला व बालविकास विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात करण्यात आले . कोरोना आजारामुळे दोन्ही पालक गमावलेल्या ० ते १८ वयोगटातील बालकांना अर्थसाह्य योजना या योजनेअंतर्गत कोरोना काळात कोरोनाच्या आजारामुळे ज्या बालकांचे दोन्ही पालक हे मुर्त्यू पावलेले आहेत . अशा बालकांच्या नावे एकरकमी पाच लाख रुपये इतकी रक्कम मुदत ठेव म्हणून जमा करण्याची हि योजना आहे . या योजने अंतर्गत हि एक रक्कमी मुदत ठेव रक्कम संबंधित बालक व जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांच्या नावे असणाऱ्या सामाहिक बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे .
बालकांविषयी दुःख व्यक्त करताना जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले कि , कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांच्यासाठी ,त्यांच्या उत्तम शिक्षणासाठी शासन म्हणून निश्चित योग्य ती जबादारी घेण्यात येईल . येणाऱ्या काळात त्यांच्या मालमत्ता हक्क बाबतीतहि भविष्यात या बालकांना कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास जिल्हाधिकारी या नात्याने या बालकांना आवश्यक ती मदत करण्यास मी नेहमीच तत्पर असेन . या वेळी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी विजय तावरे ,शिक्षण अधिकारी धनंजय चोपडे ,अनिता आमंदे .,अनाथ बालकांचे नातेवाईक नागरिक उपस्थित होते .