Saturday, August 9, 2025
HomeMain Newsकोरोनापेक्षा जास्त छळणाऱ्या ‘कोरोना कॉलर ट्यून’विरोधात जनहित याचिका

कोरोनापेक्षा जास्त छळणाऱ्या ‘कोरोना कॉलर ट्यून’विरोधात जनहित याचिका

कोरोनाच्या काळात तुम्ही समोरच्या फोन लावल्यानंतर पलीकडून अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील ‘नमस्कार, हमारा देश और पूरा आज कोरोना की चुनौती का सामना कर रहा है. कोव्हिड 19 अभी खत्म नहीं हुआ है…’, ही कॉलर ट्यून तुम्ही ऐकली असेलच. लोकांनी ही कॉलर ट्यून अनेक महिने सहन केली. पण आता या ट्यून लोक अक्षरशः वैतागले आहेत. लोकांना कोरोनापेक्षा या कॉलर ट्यूनने जास्त छळले. पण आता बास्स. कारण या कॉलर ट्यूनविरोधात आता दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे. ही जनहित याचिका कोणी दाखल केली, याबद्दल माहिती नाही. पण आता हे कॉलर ट्यूनचे प्रकरण न्यायालयात गेले आहे. दरम्यान ही कॉलर ट्यून कधी बंद होणार? असा सवाल एका वैतागलेल्या चाहतीने थेट अमिताभ यांना केला होता. यावर अमिताभ यांनी काय उत्तर द्यावे, तर त्यांनी चक्क माफी मागितली होती.

अमिताभ यांनी क्षमा त्रिपाठी नावाच्या या चाहतीला कमेंटला उत्तर देताना माफी मागितली होती. त्रिपाठीजी, तुमचे आभार. पण ती कॉलर ट्यून माझा निर्णय नाही. कोरोना काळात डब्ल्यूएचओमार्फत एक मोहिम आहे आणि तुम्ही त्याला आवाज द्या, आम्ही हा व्हिडीओ देशभर दाखवू, असे सरकारकडून मला सांगण्यात आले. आता सरकारने त्याचीच कॉलर ट्यून बनवली. अशात मी काय करणार? मी देशासाठी आणि समाजासाठी जे काही करतो, ते नि:शुल्क करतो. कुठलीही स्क्रिप्ट वगैरे नसते. बस्स, करतो. तुम्हाला या कॉलर ट्यूनचा त्रास होत असल्यास मी माफी मागतो पण माझ्या हातात करण्यासारखे काहीही नसल्याचे अमिताभ यांनी म्हटले होते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments