Saturday, August 9, 2025
HomeMain Newsकोरोना परिस्थिती निवळल्याशिवाय एकही कॉलेज सुरू होणार नाही, लवकरच होणार प्राध्यापक भरती!

कोरोना परिस्थिती निवळल्याशिवाय एकही कॉलेज सुरू होणार नाही, लवकरच होणार प्राध्यापक भरती!

राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत चालली असून कोरोनाची परिस्थिती निवळल्याशिवाय राज्यातील एकही महाविद्यालय सुरू होणार नाही, अशी स्पष्टोक्ती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिली. प्राध्यापक भरतीसाठी पदभरतीवर बंदीचा निर्णय स्थगीत केला जाणार असल्याचेही सामंत म्हणाले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बैठक घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सामंत म्हणाले की, राज्यात अनेक गोष्टी हळूहळू सुरू करण्यात येत आहेत. आता काही परीक्षा ऑनलाइन आणि ऑफलाइन घेतल्या जात आहेत. कोणत्याही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात येत आहे. ऑफलाइन परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेपूर्वी तपासणी करण्यात येणार आहे, असे सांगतानाच राज्यातील ग्रंथालये लवकरच सुरू केली जातील, असेही सामंत म्हणाले.

लवकरच प्राध्यापक भरती होणारः कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने  ४ मे रोजी शासकीय पदभरतीचा निर्णय जारी केला आहे. प्राध्यापकांच्या भरतीसाठी या निर्णयाला स्थगिती दिली जाणार असून राज्यातील प्राध्यापकांच्या रिक्त जागा लवकरच भरण्यात येणार आहेत. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी प्राध्यापक भरतीबाबत चर्चाही झाली असल्याचे सामंत यांनी सांगितले

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments