कास धरणाची उंची वाढवल्यामुळे जुना कास तलाव मार्गे जाणारा रास्ता पाण्याखाली गेल्याचे कारण सांगून हा रास्ता घाटाई मंदिरच्या मार्गे सुरु करण्यात आला आहे . या मार्गे नागरिकांना येण्याजाण्यासाठी अंतर वाढत असताना ही याकडे शासन,पुढारी आणि धनकीच्या फायद्यासाठी दुर्लक्ष करीत आहे . घाटाई परिसरात बाहेरील लोकांनी मोठ्या प्रमाणावर जमिनी खरेदी केल्या पण जमिनीच्या बाजूने घाटाई मार्गे रहदारी जास्त नसल्याने जमिनी घेऊन हि काय फायदा होत नाही असे दिसल्यावर . कास मार्गी जाणारा रास्तच बंद करून टाकला हा रस्ता बंद झाल्याने बामणोली खोऱ्यातील २२ गावांना व भांबावली परिसरातील ९ गावांना येण्या जाण्यासाठी मोठ्या पल्याने जावे लागते त्याचे कास धरणाच्या तोंडाशी दिड किलोमीटरचा रस्ता दगड मातीचा असल्याने अनेक वाहनाचे नुकसान होत आहे . त्याच बरोबर पेसेंट घेऊन अबुलन्स सारख्या वाहनांना मोठ्या प्रमाणवर त्रास होताना दिसत आहे . वेळप्रसंगी या रस्त्याने जाताना रुग्ण दगवण्याची शक्यता पण असते . पण सर्व सामान्य जनतेच्या अडचणी पेक्षा पुढारी ,धनवाणाची सोय शासनाला महत्वाची वाटत आहे .
यवतेश्वर ते कास पट्यात अनेक राजकीय मंडळींची हॉटेलस असल्याने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे . कास पठारावरील रस्ता घाटाई मार्गे पळविण्याचा घाट घातल्याचा आरोप भांबावली पर्यटन प्रमुख रवींद्र मोरे यांनी पत्रकामार्फत केला आहे . या पत्रकात त्यांनी म्हटले आहे कि घाटाई परिसरातील जमिनीवर जमिनी मंत्री ,धनिक यांनी मुबलक कवडीमोल किमतींनी खरेदी करून त्याच्या जमिनीचा फायदा व्हावा यासाठी कास पठार मार्गे येणार रास्ता बंद केला आहे . लोकांची जाणीव पूर्वक गैरसोय करण्यात येत आहे . ज्या लोकांनी जमिनी खरेदी केल्या त्यांनी मोठी सेटींग लावून घाटाई मार्गे रस्ता चालू केला पण बामणोली भागातील लोकांची मात्र गैरसोय केली आहे . याबाबत बामणोली भागातील नागरिक त्रस्त झाले असून रोजचा मोठ्या पल्ल्यामुळे इंधन ,व लोकांचे हे हाल होत आहे . त्यामुळे पूर्वीचा कास मार्गे जाणारा रस्ता सुरु करावा याची लोकांकडून मागणी होत आहे .



