निसर्गाला तोड देत अनेक अडचणींचा सामना करीत कास परिसरातील शेतकरी भातशेती करीत असतात . या भागात जंगली प्राण्याचा वावर जास्त असल्यामुळे या भागातील भात,नाचणी शेतीचे नुकसान या प्राण्यांकडून होत आहे . वारंवार अशा होणाऱ्या नुकसानामुळे शेतकरी हतबल झालेला आहे . कास परिसरातील उंबरेवाडी व आजूबाजूच्या परिसरात डोंगरमाथ्यावर नाचणी ,भातशेती मोठया प्रमाणावर केली जाते . उन्हाळ्यात तरव्याच्या भाजण्या करून मे व जूनमध्ये धूळवाफेला पेरणी केली जाते . यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने जूनच्या पहिल्याच आठवड्यात जमिनींना वाफसा चांगलं आला . ऊन पावसाचे वातावर असल्यांमुळे रोपास पोषक वातावर आहे . रात्रीच्या वेळी भाताच्या ,नाचणीच्या वावरात तराव्यांमध्ये केलेली रोपे खाण्यासाठी अनेक जंगली प्राणी येत आहेत . साळींदर ,ससे ,रानगवे ,रानडुक्कर ,आदींकडून रात्री वावरात येऊन रोपांची नासधूस केली जात आहे . या नुकसानी मुळे भाताच्या रोपांचा तुटवडा भासणार आहे . तसेच शेती लावणी अभावी पडून राहून आर्थिक झळ बसणार आहे . बऱ्याच शेतकऱ्यांनी सोसायटीचे पीक कर्ज घेतले असल्याने पीक विम्याचे संरक्षण मिळण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे .
कास परिसरात वन्य प्राण्यानांकडून पिकांची नासधूस
RELATED ARTICLES