Friday, August 8, 2025
HomeMain Newsकास पठाराला संरक्षक जाळीचे कुंपण घालण्यास सुरवात

कास पठाराला संरक्षक जाळीचे कुंपण घालण्यास सुरवात

जैवविविधतेस धोका पोहचत असल्याच्या कारणास्तव जागतिक वारसास्थळ असलेले कास पठारावरील तारेचे कुंपण प्रशासनाकडून गत वर्षी काढण्यात आले होते . सध्या अतिउत्साही ,हुल्लडबाज ,स्टंट कारण्यारांकडून वाहने राखीव क्षेत्रात नेहून जैव विविधता पायदळी तुडवीत फोटोसेशन करीत असल्याने नुकसान होत आहे . कास पठार समिती ,वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून अटकाव करूनही काही पर्यटक ऐकत नसल्याने .

सुरक्षितेसाठी वनविभागाद्वारे फुलांचा हंगाम सुरु होण्यापूर्वी मंगळवारपासून कास पठारावरील आवश्यक राखीव क्षेत्रात चार किलोमीटर अंतर संरक्षक जाळी तातपुरत्या स्वरूपात बसवण्यास सुरवात केली आहे .

आंतराष्ट्रीय जैवविविधता असणाऱ्या कास पठारावरील दुर्मिळ रंगीबेरंगी फुले पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात . पर्यटकांकडून फुलांचे नुकसान होऊ नये ,यासाठी संपूर्ण परिसर तारेच्या कुंपणाने बंदिस्त केला होता . वन्यप्राणी व पाळीव प्राण्यांचा वावर पठारावर कमी होऊ लागला . मागील काही  वर्षांपासून फुलांचे प्रमाण कमी दिसू लागले . दरम्यान ,गतवर्षी वनविभागाकडून पठारावरील संपूर्ण तारेचे कुंपण हटवण्यात आले होते . सद्य स्थितीत पठारावरील संपूर्ण परिसर सुरक्षित राहावा . यासाठी समिती कर्मचारी ,वनविभागाचे कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत . मागील दोन आठ्वड्यापासून पश्चिमेस मान्सूनने दमदार हजेरी लावल्याने हिरवागार निसर्ग ,ठिकठिकाणी फेसाळणारे धबधबे पाहण्यासाठी बहुसंख्य पर्यटक कास परिसरात भेट देत आहेत . दरम्यान ,काही अतिऊत्साही पर्यटक ,तसेच विघनसंतोषी आपली वाहने पठारावर राखीव क्षेत्रात घेऊन जाताना दिसत आहेत . काही फुले उमलेली असताना हि फुले पायदळी तुडवली जात आहेत. वारंवार सुरक्षा रक्षकांकडून समज देऊनही काही लोकांकडून वादावादीचे प्रसंग येत आहेत . उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज ,सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे ,सातारा वनक्षेत्रपाल डॉक्टर . निवृत्ती चव्हाण ,मेढा वनक्षेत्रपाल अर्जुन गंबरे ,यांच्या मार्गदर्शनाखाली पठारावरील जैव विविधतेचे  नुकसान होऊ नये ,यासाठी वनविभागा तर्फे पूर्वीच्या उभारलेल्या खांबांचा आधार घेऊन आवश्यक ठिकाणी पठार परिसरात संरक्षक जाळीच्या मदतीने बंदिस्त करणयास सुरवात झाली आहे . हंगाम संपल्यानंतर पुन्हा संरक्षक जाळी काढण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाने दिली .

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments