Friday, August 8, 2025
HomeMain Newsउद्यनराजेंचा डोंबारी खेळ बघितला ? - आ . शिवेंद्रराजेंचा ...

उद्यनराजेंचा डोंबारी खेळ बघितला ? – आ . शिवेंद्रराजेंचा सवाल

कारखान्याला ऊस घालणाऱ्या सभासदानी किंवा ऊस घालणाऱ्यानी बोलावे . उदयनराजेंनी कधी शेती केलेली नाही  त्यांनी ऊस घातला नाही . जिल्हा परिषद ,पंचायत समिती ,मार्केट कमिटी निवडणूक लागली कि कारखान्यावर आरोप करायचे पण कारखान्याची निवडणूक बिनविरोध होते . अजिंक्यतारा कारखाना १० व्या दिवशी एफआरपीचे  पैसे देतो तो भ्रष्टचार म्हणायचे का . वय वाढल्यामुळे त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे . का असे म्हणतात ,मला माहिती नाही . कारण मी त्यांच्या लेवला पोहचलो नाही . त्यांना आजूबाजूला बसणारे बगलबच्चे खोटी माहिती देतात का हे त्यांनी तपासावे . कारखान्यात भ्रष्टचार झाला हे बोलणारे उदयनराजे कोण ,कारखान्यातील सभासदांनी बोलावे . बोलण्याचा नैतिक अधिकार उदयराजेना नाही . उदयनराजे कोण ,असा प्रश्न आ . शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे . सातारा येथे खा . छ . उदयनराजे भोसले यांनी दोन दिवसापूर्वी अजिंक्यतारा सहकारी कारखान्यातील भ्रष्टचार बाहेर काढणार असल्याचे सांगितले होते . तसेच आ . शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर टीकास्त्र सोडले होते . त्यावर आ . शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला . यावेळी उदयनराजे कोण असा म्हणत प्रतिप्रश्न केला आहे . सातारा नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्याने साताऱ्यातील दोन्ही राजेंच्या पुन्हा वाकयुद्ध सुरु आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments