राष्ट्रीय महामार्गावर शिवडे ता . कराड येथील एस . के . पेट्रोल पंपावर सहा अनोळखी व्यक्तींनी पेट्रोल भरण्याच्या बहाण्याने सशस्त्र दरोडा टाकला . दरोडेखोरांनी गावठी कट्ठ्याचा धाक दाखवून पंपावरील कर्मचारी व मॅनेजर यांना बेदम मारहाण केली . तसेच पंपावरील ३५ हजार रुपयाची रोकड व दोन मोबाईल घेऊन पोबारा केला आहे . घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे गतिमान केली आहेत . सोमवार दि . १४ रोजी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली . मारहाणीत पंपावरील कर्मचारी सचिन मारुती पवार रा . केळोली ता . पाटण सध्या राहणार उंब्रज यास डोक्यास मर लागल्याने तो जखमी झाला आहे . तसेच पंपाचे मॅनेजर कृष्णता साळूंखे हे झटापटीत किरोकोळ जखमी झाले आहेत .
याबाबत अधिक माहिती अशी कि उंब्रज नजीक शिवडे ता . कराड गावाचे राष्ट्रीय महामार्गालगत एस. के पेट्रोल पंप आहे . सोमवारी दि . १४ रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीवरून सुमारे सहा जण तोडांला मास्क ,डोक्याला टपऱ्या गुंडाळून पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आले . त्यांनी दोन दुचाकीच्या पेट्रोल टाक्या फुल करून घेतल्या . त्यांनी सुमारे १८७० रुपयाचे पेट्रोल दोन्ही गाड्यात भरले . त्यानंतर पंपावरील कर्मचाऱ्यास एटीम कार्ड असल्या
चे सांगितले . त्यामुळे मॅनेजर कृष्णत साळुंखे हे पंपाच्या केबिनमधून स्वॅप मशीन घेऊन आले . व हातात मशीन घेऊन एटीम कार्डची मागणी केली . त्यावेळी अचानक त्यातील एकाने हातातील गावठी पिस्तूल सदृश हत्यार मॅनेजर साळुंखे यांच्या डोक्यास लावले व कर्मचारी पवार व साळूंखे या दोघांना मारहाण करण्यास सुरवात केली . मारहाण करत त्यांनी दोघांना ढकलत केबिनमध्ये नेले . त्या ठिकाणी मारहाण करत धक्काबुकी केली तसेच कर्मचारी सचिन पवार यांना डोक्यात पाण्याचा झार व खुर्ची मारून जखमी केले . दमबाजी करत पवार याच्या खिशातील १८ हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले . तसेच मॅनेजर यांच्या खिशातून रोकड काढून घेतली . यावेळी झालेल्या झटापटीत साळूंखे यांना किरकोळ दुखापत झाली आहे . दरम्यान दरोडेखोरांनी सॅमसंग व विवो कंपनीचे सुमारे बारा हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल काढून घेतले . रोख रक्कम २५ हजार व बारा हजाराचे मोबाईल मिळून सुमारे ३७ हजाराचा मुद्दे माल घेऊन त्यांनी पोबारा केला . रात्री बाराच्या सुमारास पेट्रोल पंपावर शुकशुकाट होता याचा गैरफायदा घेत अनोळखी सहा दरोडेखोर दोन दुचाकीवरून उंब्रज दिसणे पेट्रोल पंपावर आले होते . त्या ठिकाणी लूटमार करून त्यांनी कराड दिशेला पोबारा केल्याचे संपूर्ण घटना पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद झाली आहे .
घटनेचे गांभीर्य ओळखून सपोनि अजय गोरड यांनी एसके पंपावर धाव घेऊन तपास कार्याला सुरवात केली . तसेच घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते ,अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील ,पोलीस उपाधीक्षक कराड विभाग , परीक्षाविधीन अधीकारी रेणू खोकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली .दरम्यान पोलिसांची तीन पथके विविध ठिकाणी रवाना केली