जोधपुर :बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरवलेल्या आसारामचे आता खऱ्या कैद्याचे जीवन सुरु झाले असून जेलमध्ये आसाराम कैदी नंबर १३० असून त्याला विशेष कोठडीत ठेवण्यात आले आहे .त्याला कालपर्यंत दोषी ठरवले नसल्यामुळे नेहमीची वापरण्याची परवानगी होती .पण आता त्याला कैद्याचा पोशाख देण्यात आला आहे.सध्या आसारामचे वय ७७ वर्ष असल्याने त्याला झेपेल असेच काम देण्यात येणार आहे .इतर कैद्यांना जे जेवण मिळते तेच जेवण त्याला देण्यात येणार आहे .सुरक्षा आणि खबरदारी म्हणून आसारामला वेगळे ठेवण्यांत आले आहे .इतर कैद्यांना भेटू दिले जात नाही .