Friday, August 8, 2025
HomeMain Newsआसाममध्ये पोलिसांचा स्थानिकांवर गोळीबार

आसाममध्ये पोलिसांचा स्थानिकांवर गोळीबार

आसामच्या दारंग जिल्ह्यातील सिपाझार भागात गुरुवारी अतिक्रमण विरोधी मोहिमेतून पोलिसांच्या क्रूरतेचे भयानक दृश्य एका व्हिडिओमधून समोर आले आहे. ज्यामध्ये पोलिस एका माणसावर गोळीबार करत असताना आणि मारहाण करताना दिसत आहेत. एक फोटोग्राफर देखील ज्याच्या छातीत गोळी लागलेली दिसते त्या व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहे. बिजय शंकर बनिया असे या फोटोग्राफरचे नाव असल्याचे वृत्तसंस्था पीटीआयने वृत्त दिले आहे. बनिया हा एक व्यावसायिक छायाचित्रकार आहे. त्याला जिल्हा प्रशासनाने कारवाईचे फोटो काढण्यासाठी नियुक्त केले होते. आता त्यांला अटक करण्यात आली आहे.

व्हिडीओमध्ये शेकडो पोलिस झाडांच्या मागून अंदाधुंद गोळीबार करताना दिसत आहेत.

कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे आसाम पोलिसांनी सुरुवातीला एनडीटीव्हीला सांगितले. मात्र पोलिसांच्या कारवाईत दोन जणांचा मृत्यू झाला. पोलिसांसह किमान २० लोक जखमी झाले आहेत.

राज्याच्या मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण झाल्याचा दावा करीत, हे अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस आले असता, पोलिसांचे हे भयानक कृत्य करतानाचे दृश्य समोर आले. आसाम सरकारने या जमिनीवरील अतिक्रमण काढून त्याचे राज्य कृषी प्रकल्पात रूपांतर करण्याचा निर्णय घेतला होता.

या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. पोलिसांनी एका माणसावर गोळीबार केल्याचा आणि नंतर त्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ ‘द वायर’ने पाहिला आहे. मात्र त्याची भयानकता एव्हढी आहे, की तो प्रसिद्ध करता येत नाही. हा व्हिडीओ मन विचलित करू शकतो.

फोटोग्राफर, बनिया, त्या व्यक्तीला लाथ मारताना दिसत आहे, जो बहुधा मृत आहे. बनियाला एका पोलिसाने त्या व्यक्तीच्या शरीरापासून दूर नेताना दिसत आहे. परंतु बनिया पुन्हा हल्ला करण्यासाठी परतताना दिसत आहे. त्याला अटक करण्यात आली आहे, असे पीटीआयने म्हटले आहे.

‘स्क्रोल’च्या म्हणण्यानुसार ‘प्रशासनाने बुधवारी रात्री उशिरा किरकोटा चारमधील रहिवाशांना अतिक्रमण काढण्याची नोटीस बजावली. गुरुवारी सकाळी या नोटीशीचा निषेध करण्यासाठी सभा झाली. त्यानंतर प्रशासनाने “हमी दिली की ग्रामस्थांना हटवण्यापूर्वी त्यांचे पुनर्वसन केले जाईल”. परंतु जेव्हा कार्यकर्ते परिसर सोडून गेले तेव्हा पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला, असे रहिवाशांनी स्क्रोलला सांगितले.

‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की स्थानिकांनी त्यांच्यावर दगडांनी हल्ला केला आणि त्यांना बळाचा वापर करावा लागला. “आमचे नऊ पोलिस जखमी झाले. दोन नागरिकही जखमी झाले. त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. आता परिस्थिती सामान्य आहे, ” पोलीस अधीक्षक सुशांत बिस्वा सरमा यांनी सांगितले. सुशांत बिस्वा सरमा हे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांचे भाऊ आहेत.

सरमा घटनेच्या ठिकाणी होते आणि म्हणाले की अतिक्रमण विरोधी मोहीम पूर्ण होऊ शकलेली नाही. त्यांनी पोलिसांनी गोळीबार केल्याबद्दल माहिती नसल्याचा दावा केला. ते म्हणाले, “परिसर मोठा आहे. मी दुसऱ्या बाजूला होतो. मी परिस्थितीचा आढावा घेत आहे.”

“या घटनेनंतर अतिक्रमण विरोधी मोहीम पुन्हा सुरू झाली आहे आणि उद्याही सुरू राहील,” असे सरमा यांनी गुवाहाटीतील पत्रकारांना सांगितले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पोलिसांच्या क्रूरतेचा निषेध करत ट्वीट केले, की “आसाममध्ये राज्य पुरस्कृत गोळीबार होत आहे”.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments